स्तनपान देणाऱ्या मातेस बाहेर हाकलले!

By admin | Published: July 15, 2015 12:09 AM2015-07-15T00:09:41+5:302015-07-15T03:13:22+5:30

स्तनपान हा प्रत्येक बाळाचा आणि त्याच्या मातेचा मुलभूत मानवी हक्क असूनही आणि आधुनिक वैद्यकशास्त्रही स्तनपानाचा आग्रही पुरस्कार करू लागले असताना

Breast-feeding mothers out! | स्तनपान देणाऱ्या मातेस बाहेर हाकलले!

स्तनपान देणाऱ्या मातेस बाहेर हाकलले!

Next

लंडन : स्तनपान हा प्रत्येक बाळाचा आणि त्याच्या मातेचा मुलभूत मानवी हक्क असूनही आणि आधुनिक वैद्यकशास्त्रही स्तनपानाचा आग्रही पुरस्कार करू लागले असताना, गर्दीपासून दूर जाऊन आपल्या
नऊ महिन्यांच्या मुलीला स्तनपान देणाऱ्या एका मातेस, एका लोकप्रिय डिपार्टमेंटल स्टोअरमधून, सक्तीने बाहेर हाकलून दिल्याची घटना पुढारलेल्या ब्रिटनमध्ये घडली आहे.
चार मुलांची आई असलेल्या कॅरोलिन स्टॉर्मर या महिलेच्या बाबतीत हा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. लिचेस्टर परगण्यातील ‘प्रायमार्क’ या अग्रगण्य डिपार्टमेंटल स्टोअरच्या सुरक्षा रक्षकाने स्तनपान करणाऱ्या मुलीस हिसकावून घेतले व कॅरोलिनला स्टोअरबाहेर काढले. कॅरोलिनने या प्रकाराची पोलिसांतही रीतसर फिर्याद नोंदविली आहे. स्तनपानाचा पुरस्कार करणाऱ्या ‘फ्री टू फीड’ या फेसबूकवरील सपोर्ट ग्रुपवर कॅरोलिनने आपला हा अनुभव पोस्ट केल्यापासून
टीकेचे मोहोळ उठले आहे. कॅरोलिनच्या पतीने स्टोअरच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केल्यावर ‘प्रायमार्क’ने सारवासारव केली. टीकेची दखल घेऊन स्टोअरच्या व्यवस्थापनानेही फेसबूकवर पोस्ट टाकले. त्यात त्यांनी म्हटले की, आमच्या स्टोअरमध्ये माता आपल्या मुलांना अगदी खुशाल स्तनपान देऊ शकतात. या घटनेची आम्ही चौकशी करीत आहोत.
कॅरोलिनने तिच्या फेसबूक पोस्टमध्ये विषद केलेला सर्व घटनाक्रम स्टोअरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही अगदी स्पष्टपणे टिपला गेला आहे. त्याच्या साह्याने पोलिसही तपास करीत आहेत. (वृत्तसंस्था)

तामिळनाडूत बसस्थानकावर स्वतंत्र खोली
ब्रिटनसारख्या पुढारलेल्या देशात घडलेल्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतात तमिळनाडू सरकारने अलीकडेच घेतलेला निर्णय किती पुरोगामी आहे हेच अधोरेखित होते. मातेने पदराखाली घेऊन आपल्या अपत्यास स्तनपान देणे हे खरे तर अगदी नैसर्गिक आहे. पण बघणाऱ्यांच्या नजरेत खोट असते त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी स्तनपान देताना महिलांची मोठी कुचंबणा होते. हे लक्षात घेऊनच तमिळनाडू सरकारने राज्यभरातील एस.टी. स्थानकांवर स्तनदा मातांसाठी स्वतंत्र खोलीची सोय करण्याचे ठरविले आहे.

Web Title: Breast-feeding mothers out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.