आईचे दूध पिणारी मुले अधिक बुद्धीमान!

By admin | Published: March 18, 2015 11:48 PM2015-03-18T23:48:38+5:302015-03-18T23:48:38+5:30

मातेचे दूध आणि मुलांचा बुद्ध्यांक यांचा परस्पर संबंध असून , ज्या मुलांना मातेचे दूध मिळते, त्यांचा बुद्ध्यांक जास्त असतो असे नव्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

Breastfeeding children more intelligent! | आईचे दूध पिणारी मुले अधिक बुद्धीमान!

आईचे दूध पिणारी मुले अधिक बुद्धीमान!

Next

लंडन : मातेचे दूध आणि मुलांचा बुद्ध्यांक यांचा परस्पर संबंध असून , ज्या मुलांना मातेचे दूध मिळते, त्यांचा बुद्ध्यांक जास्त असतो असे नव्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. मातेचे दूध पुरेसे मिळणारी मुले मोठी झाल्यानंतर बुद्धीच्या चाचणीत चांगले गुण मिळवू शकतात.
ब्राझीलमध्ये या संदर्भात अभ्यास झाला आहे. समाजाच्या सर्व स्तरातील ३५०० मुलांचा अभ्यास करण्यात आला असून, त्याचा हा निष्कर्ष आहे. हे निष्कर्ष अद्याप निर्णायक नाहीत, पण सध्या मुलांना किमान सहा महिने स्वत:चे दूध पाजा असा सल्ला डॉक्टर देतात, त्याच्याशी हा निष्कर्ष निगडित आहे.
डॉक्टरांचा असा सल्ला असला तरीही अखेरचा निर्णय मातेचा असतो. मुलाला आपले दूध द्यावे की नाही हा निर्णय माताच घेत असते. नव्या अभ्यासाचे निष्कर्ष द लॅन्सेट ग्लोबल हेल्थ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. मुलाच्या बुद्धिमत्तेवर केवळ आईच्या दुधाचा परिणाम होतो असे नाही, त्यासाठी इतर अनेक घटक कारणीभूत असतात. आईचे शिक्षण, कुटुंबाचे उत्पन्न, जन्माच्या वेळी मुलाचे वजन हेही घटक मुलाच्या विकासात कारणीभूत असतात.
ब्राझीलमधील पेलोटास येथील डॉ. बर्नार्डो लेसा होर्टा यांच्या मते या संशोधनाने आत्मदृष्टी जागृत होते. ज्या मातांचा त्यांनी अभ्यास केला त्यात सर्व स्तरात बाळांना मातेचे दूध देण्याची पद्धत होती. केवळ श्रीमंत व सुशिक्षित महिलाच नव्हे, तर सर्व स्तरातील मुलांना मातेचे दूध दिले जात असे. पण काही मुलांना वर्षभर माता पाजत असत, तर काही मुलांना ते एखादाच महिना मिळत असे. ज्यांना वर्षभर वा त्यापेक्षाही जास्त काळ मातेचे दूध मिळाले, ती मुले अभ्यासात वा बुद्धीच्या चाचण्यात अधिक गुण मिळवतात असे स्पष्ट झाले. त्यांनी शिक्षण चांगले पूर्ण के ले व त्यांचे उत्पन्नही चांगले होते. (वृत्तसंस्था)

४डॉ. होर्टा यांच्या मते मातेच्या दुधाचे लाभ मुलाला दीर्घकाळ मिळतात. कारण मातेच्या दुधात एकत्रित तीव्र स्थूल आम्लांची साखळी मुलांना मिळते. मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी ती अत्यंत आवश्यक असते. आईचे दूध आणि मुलाच्या बुद्धीचा संबंध असतो हे सिद्ध करण्यासाठी या मुद्यावर आणखी संशोधन होण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

४इंग्लंडमधील सार्वजनिक आरोग्य खात्याचे राष्ट्रीय संचालक केविन फेंटन यांच्या मते मातेच्या दुधामुळे मुलाच्या आरोग्यावर परिणाम होतो. हे स्पष्ट आहे. १२ महिन्यांपेक्षा लहान मुलांना आईचे दूध मिळाले पाहिजे.

Web Title: Breastfeeding children more intelligent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.