अन् महिला सिनेटरने संसदेतच तान्हुलीला केले स्तनपान
By admin | Published: May 10, 2017 09:06 PM2017-05-10T21:06:21+5:302017-05-10T21:07:01+5:30
आजच्या काळात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने महिलांना घराबाहेर राहावे लागते. त्यामुळे अशा महिलांना आपल्या मुलांना
Next
ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. 10 - आजच्या काळात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने महिलांना घराबाहेर राहावे लागते. त्यामुळे अशा महिलांना आपल्या मुलांना पुरेसा वेळ देता येत नाही. बऱ्याचदा तान्ह्या मुलांनाही घरी ठेवून असल्याने लेकुरवाळ्या मातांची तर फार अडचण होते. मात्र ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँड प्रांतातील सिनेटर लारिसा वॉटर्स यांना आपल्या दोन महिन्यांच्या मुलीला थेट संसदेतच स्तनपान करवून नवा पायंडा पाडला आहे. त्याबरोबर वॉटर्स यांची मुलगी कुठल्याही संसदेत स्तनपान करणारी जगातील पहिली मुलगी ठरली आहे.
माझी मुलगी आलिया फेडरल पार्लामेंटमध्ये स्तनपान करणारी पहिली मुलगी ठरली याचा मला अभिमान आहे, असे ट्विट लारिया वॉटर यांनी केले आहे. तसेच त्यांनी स्तनपान करतानाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
लासिसा वॉटर्स या ऑस्ट्रेलियातील ग्रीन पार्टीच्या उपनेत्या आहेत. त्यांना दोन महिन्यांपूर्वीच आलियाच्या रुपात कन्यारत्नाची प्राप्ती झाली होती. दरम्यान, वॉटर्स मंगळवारी आपल्या मातृत्व रजेवरून कामावर परतल्या. त्यावेळी संसदेत येताना त्यांनी आपल्या छोट्या मुलीलाही संसदेत आणले होते. यासंदर्भातीत वृत्त सीएनएन या वाहिनीने दिले आहे.
ऑस्ट्रेलियन संसदेने महिला सिनेटर्सना संसदेत आपल्या लहान मुलांना सोबत आणण्यासाठी नियमात बदल करावा यासाठी पाठपुरावा करणाऱ्यांमध्ये वॉटर्स यांचा समावेश होता गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन संसदेने यासंदर्भातील नियमात बदल केला होता. त्याआधी महिला सिनेटर्सना लहान मुलांना सभागृहात आणण्यास मनाई होती.
So proud that my daughter Alia is the first baby to be breastfed in the federal Parliament! We need more #women & parents in Parli #auspolpic.twitter.com/w34nxWxG0y
— Larissa Waters (@larissawaters) May 9, 2017