'ऑफिसमध्ये येताना टॉयलेट पेपरही घेऊन या'; एलॉन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना दिला नवा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 03:50 PM2023-01-01T15:50:10+5:302023-01-01T16:15:13+5:30

ट्विटरचा खर्च कमी करण्यासाठी मस्कने आता मर्यादा ओलांडली आहे.

'Bring toilet paper with you when you come to the office'; Elon Musk gave a new order to the employees | 'ऑफिसमध्ये येताना टॉयलेट पेपरही घेऊन या'; एलॉन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना दिला नवा आदेश

'ऑफिसमध्ये येताना टॉयलेट पेपरही घेऊन या'; एलॉन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना दिला नवा आदेश

googlenewsNext

नवी दिल्ली: ट्विटर विकत घेतल्यापासून एलॉन मस्क यांची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे. ट्विटरच्या खर्चाचा भार कमी करण्यासाठी एलॉन मस्कने आधी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले, त्यानंतर ऑफिसमधून वस्तू विकायला सुरुवात केली. ट्विटरचा खर्च कमी करण्यासाठी मस्कने आता मर्यादा ओलांडली आहे. एलॉन मस्क यांनी आता कार्यालयातील टॉयलेट पेपरची सुविधा देखील रद्द केली आहे. तसेच ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना घरून कामावर येताना टॉयलेट पेपर आणायला सांगितले आहेत.

एका रिपोर्टनुसार, ट्विटरच्या कार्यालयाची अवस्था सध्या फार वाईट झाली आहे. येथील शौचालय अस्वच्छ असून त्यातून दुर्गंधी पसरली आहे. कर्मचाऱ्यांना टॉयलेट पेपरही घरून आणण्यासाठी सांगण्यात आले आहे. अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिल्यानंतर कंपनीवर आता अशी परिस्थिती आली आहे की, तेथील बाथरुममध्ये आता टॉयलेट पेपरही उपलब्ध नाही. 

दरम्यान, एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी खरेदी केल्यापासून ते त्यांच्या अनेक निर्णयांमुळे प्रचंड चर्चेत आहेत. मस्क यांनी ट्विटरचा ताबा मिळताच मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. शिवाय कंपनी आणि ट्विटर प्लॅटफॉर्ममध्येही अनेक मोठे बदल केले. त्यानंतर ट्विटरमधील कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले होते. आताही ट्विटरच्या ऑफिसमधील वातावरण सुधारलेले नाही.

Web Title: 'Bring toilet paper with you when you come to the office'; Elon Musk gave a new order to the employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.