मुलांसाठी जग एकत्र आणूया
By admin | Published: December 11, 2014 12:08 AM2014-12-11T00:08:18+5:302014-12-11T00:08:18+5:30
सहभाव जागृत करू की ज्यातून न्याय, समता आणि स्वातंत्र्य अशी तत्त्वे आचरणात आणणारा समाज अस्तित्वात येऊ शकतो, असे कैलास सत्यार्थी म्हणाले.
Next
नोबेल पुरस्कार : सत्यार्थी, मलालाचे आवाहन, सहभाव जागृत करूया
ओस्लो : एका व्यक्तीच्या मनातील स्नेहभावाला आपण जागतिक भावनेचे रुप देऊया , निराशावादी दया नको, पण असा सहभाव जागृत करू की ज्यातून न्याय, समता आणि स्वातंत्र्य अशी तत्त्वे आचरणात आणणारा समाज अस्तित्वात येऊ शकतो, असे कैलास सत्यार्थी म्हणाले. आपल्याला जगाला खरी शांतता काय असते हे सांगायचे असेल तर आपल्याला मुलांपासून सुरुवात केली पाहिजे हे महात्मा गांधीजींचे वचनही त्यानी उद्धृत केले. त्यापुढे जाऊन मला एवढेच सांगायचे आहे की मुलांच्या स्नेहभावासाठी संपूर्ण जग एकत्र आणूया.
आजर्पयत कारखान्यात मजूर म्हणून काम करणा:या 8क् हजार मुलांची सुटका केली आहे, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनांच्या आकडेवारीनुसार जगात 168क् लाख मुले बालकामगार आहेत. त्यातील 6क्क् लक्ष मुले भारतात आहेत. असतो मा सद्गमय मृत्योर्मा अमृतोगमय
तमसो मा ज्योतिर्गमय
हा संस्कृत ोक सादर करुन सत्यार्थी यांनी भाषण संपविले. भाषणाची सुरुवात त्यांनी संस्कृत श्लोकाने व अखेरही श्लोकाने केली. सत्यार्थी यांनी भाषण हिंदी, इंग्रजीतून केले.
जागतिक श्रोतेसमुदायातून वेळोवेळी टाळ्यांचा कडकडाट होत होता. तालिबानच्या प्राणघातक हल्ल्यातून दोन वर्षापूर्वी वाचलेल्या 17 वर्षाच्या मलालाला मुलींच्या शिक्षणासाठी केलेल्या संघर्षासाठी शांततेचा पुरस्कार देण्यात आला. मलाला म्हणाली हा फक्त माझा दिवस नाही तर शाळेत शिकण्याची इच्छा असणा:या प्रत्येक मुलाचा, मुलीचा आहे. आजही 66 दशलक्ष मुलींना शाळेत जाणो शक्य झालेले नाही.
आपल्या भाषणाच्या प्रारंभीच मलालाने आपल्या वडीलांचे आभार मानले. माङो पंख न कापता , मला उडण्याचे स्वातंत्र्य दिल्याबद्दल तुमचे आभार. आईचे आभार मानताना तिने आईने दिलेल्या प्रेरणा व सत्य या मूल्यांचा उल्लेख केला. (वृत्तसंस्था)
आजच्या पुरस्काराचा सर्व पैसा मलाला निधीत जाईल व त्याचा वापर मुलींना शिक्षण घेण्यासाठी केला जाईल असे तिने सांगितले.
जागतिक शांतता दूतांचे बोल..
मी आज शांततेचा आवाज म्हणून उभा आहे. निष्पाप मुलांचे रडणो व अदृश्यतेचा चेहरा असे माङो आजचे स्वरुप आहे. मी माङया मुलांची स्वप्ने तुमच्यार्पयत पोहोचविण्यासाठी आलो आहे, असे सत्यार्थी म्हणाले.
ही सर्व आपली मुले आहेत, असे सत्यार्थी म्हणाले.
मलाला म्हणाली, माङया एका मैत्रिणीचे डॉक्टर व्हायचे स्वप्न होते. पण 12 व्या वर्षी तिचे लगA झाले व 14 व्या वर्षी ती आई बनली. ज्या मुलींची स्वप्ने पूर्ण झाली नाहीत, त्यांच्या स्वप्नांसाठी हा पैसा आहे.
असे, मलाला म्हणाली.
तिने म्हटले आहे.
भाषणातील एक पान हरवले
4सत्यार्थी यांचे भाषणातील एक पान हरवले. भाषण करताना ही बाब त्यांच्या लक्षात आली, त्यांनी ही माहिती सांगताच सभागृहातून हास्याची लाट फुटली. सत्यार्थींनी सावरुन घेत भाषण सुरु केले. पण काही मिनिटात हरवलेले पान घेऊन नॉव्रेचे अधिकारी मंचावर आले. त्यानी पान देताच हास्याची कारंजी उडाली.
मलाला माझी मुलगी
4आज आनंदाचा दिवस आहे. आजची सर्वात चांगली घटना म्हणजे मला माझी तरुण व धाडसी पाकिस्तानी मुलगी भेटली. पाकिस्तानी मुलगी आणि भारतीय पिता यांची आज भेट झाली.