चीनबरोबर युद्धाचा धोका; जपान अन् पश्चिम आशियात हजारो सैनिक पाठवतायत हे दोन 'बलाढ्य' देश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 03:40 PM2020-07-05T15:40:50+5:302020-07-05T15:49:42+5:30
इंडो-पॅसिफिक भागातील शीत युद्धानंतर हेच सर्वात महत्वाचे भूराजकीय आव्हान आहे. या तैनातिनंतर अमेरिकन सैन्याचा वैश्विक दरारा पुन्हा एक कायम होईल?
वॉशिंगटन/लंडन - भारतासह संबंद आशियातील शेजारील देशांसोबत दादागिरी करणाऱ्या चीनचे नाक ठेसण्यासाठी दोन बलाढ्य देशांनी कंबर कसली आहे. अमेरिकेने आपले हजारो सैनिक जपानपासून ऑस्ट्रेलियापर्यंत संपूर्ण आशियात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
इंडो-पॅसिफिक भागातील शीत युद्धानंतर हेच सर्वात महत्वाचे भूराजकीय आव्हान आहे. या तैनातिनंतर अमेरिकन सैन्याचा वैश्विक दरारा पुन्हा एक कायम होईल, असे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला वाटते. अमेरिकेशिवाय इंग्लंडनेही आपले हजारो कमांडोज अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्वेज कालव्याजवळ तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिका जर्मनीमध्ये तैनात असलेले आपले हजारो सैनिक आता आशियात तैनात करणार आहे. हे सैनिक अमेरिकेच्या गुआम, हवाई, अलास्का, जपान आणि ऑस्ट्रेलियातील सैन्य ठिकानांवर तैनात केले जातील. जपानच्या निक्केई आशियन रिव्ह्यूच्या अहवालामुसार आता अमेरिकेची प्राथमिकता बदलली आहे. शीत युद्धाच्या काळात, सोव्हियत संघावर नियंत्रण ठेवण्यासाठी युरोपात मोठ्या प्रमाणावर सैन्य ठेवणे आवश्यक आहे, असे अमेरिकन तज्ज्ञांचे मत होत.
अमेरिकेच्या निशाण्यावर चीन -
अहवालात म्हणण्यात आले आहे, की वर्ष 2000च्या दशकात अमेरिकेचे मुख्य लक्ष्य दहशतवाद होते. त्यांनी इराक आणि अफगानिस्तानमधील दहशतवादाविरोधात युद्ध पुकारले होते. ट्रम्प यांचे राष्ट्रीय संरक्षण सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी गेल्या महितीन्यात आपल्या एका लेखात म्हटले होते, की 'चीन आणि रशिया सारख्या दोन महाशक्तींशी स्पर्धा करण्यासाठी अमेरिकन सैन्याला निश्चितपणे पुढील भागांत पूर्वीच्या तुलनेत अधिक झपाट्याने सैन्य तैनाती वाढवावी लागेल.' यामुळे आता अमेरिका जर्मनीतील आपले सैन्य 34, 500वरून 25 हजारवर आणत आहे आणि उर्वरित 9,500 सैनिक इंडो-पॅसिफिक भगांत तैनात करत आहे.
चीनचा सामना करण्यासाठी इंग्लंड आशियात पाठवतोय सैनिक -
फायनाशियल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चीनचा धोका ओळखून त्याचा सामना करण्यासाठी, आता अमेरिकेनंतर इंग्लंडदेखील आपले सैन्य आशियात पाठवत आहे. आशियातील सहकारी देशांशी जवळीक वाढवून आणि स्वेज कालव्याजवळ अधिक सैनिक तैनात करून चीनवर दबाव टाकला जाऊ शकतो, असे ब्रिटिश सैन्याला वाटते. यासाठी इंग्लंडच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांनी मंत्र्यांची भेट घेतली होती. स्वेज कालवा हा जगातील सर्व जास्त व्यस्त मार्ग आहे. तसेच चीनचे मोठ्या प्रमाणावर सामान याच मार्गाने युरोपात जाते.
कोरोना व्हायरस संपुष्टात आल्यानंतर जगभरात आर्थिक संकट, वाद आणि तंटे वाढतील, असा इशारा इंग्लंडचे संरक्षण मंत्री बेन वालेस यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
चीन सीमेवर तणाव वाढतोय, पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; अर्धातास चालली चर्चा
...पण, पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यासाठी लेहपासून 25KM दूर असलेले 'न्योमा'च का निवडले?
भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!
CoronaVirus : धक्कादायक! कोरोनाचं नव रूप आलं समोर, अधिक वेगानं लोकांना करतोय संक्रमित; पण...