ब्रिटन आणि युरोपही आता सुरक्षित राहिले नाहीत - ट्रम्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2016 03:52 AM2016-03-29T03:52:22+5:302016-03-29T03:52:22+5:30

ब्रिटन आणि युरोपही आता सुरक्षित राहिले नाहीत, अशा शब्दांत रिपब्लिकनचे प्रबळ दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रसेल्स हल्ल्यावर भाष्य केले आहे.

Britain and Europe are no longer safe - Trump | ब्रिटन आणि युरोपही आता सुरक्षित राहिले नाहीत - ट्रम्प

ब्रिटन आणि युरोपही आता सुरक्षित राहिले नाहीत - ट्रम्प

Next

वॉशिंग्टन : ब्रिटन आणि युरोपही आता सुरक्षित राहिले नाहीत, अशा शब्दांत रिपब्लिकनचे प्रबळ दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रसेल्स हल्ल्यावर भाष्य केले आहे.
येथे एका वृत्तसंस्थेशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, युरोपमधील परिस्थिती कठीण आहे. तथापि, अमेरिकन नागरिकांसाठी अमेरिका सुरक्षित आहे, असाही विचार मी कधी केला नाही. इंग्लंड असो की, ब्रसेल्स अथवा युरोप हे आता सुरक्षित राहिलेले नाहीत. अमेरिकेचे विदेशमंत्री जॉन केरी यांनी जनतेला नुकतेच आवाहन केले आहे की, युरोपात गेल्यावर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी यावर भाष्य केले आहे, हे विशेष.
 

 

Web Title: Britain and Europe are no longer safe - Trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.