वयाच्या ५७ व्या वर्षी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन सातव्यांदा बनले 'बाबा'; घरी झालं चिमुकलीचं आगमन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 02:13 PM2021-12-10T14:13:23+5:302021-12-10T14:13:42+5:30
ब्रिटनचे पंतप्रधान (British Prime Minister) बोरिस जॉन्सन (Boris Johnson) वयाच्या ५७ व्या वर्षी सातव्यांदा वडील झाले आहेत. त्याची पत्नी ...
ब्रिटनचे पंतप्रधान (British Prime Minister) बोरिस जॉन्सन (Boris Johnson) वयाच्या ५७ व्या वर्षी सातव्यांदा वडील झाले आहेत. त्याची पत्नी कॅरी जॉन्सनने (Carrie Johnson) गुरुवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला. आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. 'ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या पत्नीने गुरुवारी सकाळी लंडनच्या रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला. दोघांनीही काळजी आणि सहकार्यासाठी राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या टीमचे आभार मानले आहेत,' असं ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
या वर्षाच्या सुरुवातीला कॅरी जॉन्सन यांचा गर्भपात झाला होता. जुलैमध्ये एका इन्स्टाग्राम (Instagram Post) पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली होती. वर्षाच्या सुरुवातीला माझा गर्भपात झाला होता, त्यामुळे मी देखील दु:खी होते. पण आता पुन्हा गर्भवती राहिल्याने मला आनंद होत आहे," असंही त्यांनी लिहिलं होतं.
बोरिस जॉन्सन यांनी या वर्षी मे महिन्यात वेस्टमिंस्टर कॅथेड्रल येथे कॅरी जॉन्सन यांच्याशी विवाह केला होता. यापूर्वी त्यांनी कॅरी सायमंड्स यांच्याशी विवाह केला होता. आता बोरिस जॉन्सन यांचं हे तिसरं लग्न आहे. बोरिस जॉन्सन आणि त्यांच्या पूर्वाश्रमीची पत्नी मरिना व्हिलर यांना घटस्फोट दिल्यानंतर त्यांचं हे तिसरं लग्न आहे. मरिना आणि बोरिस जॉन्सन यांना चार मुलं आहेत. बोरिस जॉन्सन आणि त्यांच्या आर्ट कन्सल्टन्ट हेलेन मॅकिनटायर यांच्याशीदेखील अफेयर होत. त्यांना २००९ मध्ये एक अपत्य झालं.