Corona Virus : ब्रिटनमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा कहर; जानेवारीनंतर पहिल्यांदाच रुग्णांचा आकडा 40000 वर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 01:16 PM2021-07-15T13:16:04+5:302021-07-15T13:17:39+5:30

Corona Virus : ब्रिटन 19 जुलैपासून लॉकडाऊनशी संबंधित निर्बंध हटवणार (Britain Lockdown Lifting) आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता हा निर्णय मागे घेतला जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

britain delta variant covid cases rises in britain 40000 new cases after january | Corona Virus : ब्रिटनमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा कहर; जानेवारीनंतर पहिल्यांदाच रुग्णांचा आकडा 40000 वर 

Corona Virus : ब्रिटनमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा कहर; जानेवारीनंतर पहिल्यांदाच रुग्णांचा आकडा 40000 वर 

Next

लंडन : ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) डेल्टा व्हेरिएंटमुळे (Delta Variant) पुन्हा संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोना व्हासरसच्या संसर्गाची 42,302 नवीन प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. तर 49 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही 15 जानेवारीनंतरची दिवसातील सर्वात मोठी संख्या आहे. विशेष म्हणजे ब्रिटन 19 जुलैपासून लॉकडाऊनशी संबंधित निर्बंध हटवणार (Britain Lockdown Lifting) आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता हा निर्णय मागे घेतला जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रिटनच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 12 जुलैपर्यंत ही आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या 7 दिवसांत येथे 2 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत, परंतु फक्त 168 जणांचे मृत्यू झाले. तर नोव्हेंबर 2020 मध्ये एका आठवड्यात 2,400 जणांच्या मृत्यूची नोंदी झाली होती. यातच, ब्रिटनमधील दोन तृतीयांश वयस्कर व्यक्तींना कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत, असे ब्रिटनचे आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी म्हटले आहे. 

ट्विटरवर साजिद जाविद म्हणाले की, 'आता यूकेमधील दोन तृतीयांश वृद्धांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. आम्ही जवळजवळ एका आठवड्यात लसीकरणाचे लक्ष्य गाठले आहे. ही एक मोठी कामगिरी आहे. लस घेण्यासाठी पुढे आलेल्या प्रत्येकाचे आभार. लस ही व्हायरस विरूद्ध आपली ढाल आहे.'

66.7 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस
ब्रिटनमध्ये आतापर्यंत 8 कोटी 11 लाख 92 हजार 857 लस डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी 4 कोटी 60 लाख 37 हजार 90 म्हणजेच 87.4 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे, तर 3 कोटी 51 लाख 55 हजार 767 म्हणजेच 66.7 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत, असे 'डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड सोशल केअर'च्या (DHSC)  ताज्या आकडेवारीवरून दिसून येते. लसीकरणाद्वारे लोकांना रुग्णालयात दाखल करणे आणि त्यांना कोरोनाच्या मृत्यूपासून वाचविले जाऊ शकते, असे म्हटले जात आहे.


पंतप्रधानांकडून कौतुक
पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ट्विटरवरून दोन तृतीयांश वयस्कर लोकांनी कोरोनाची लस घेतल्याबद्दल कौतुक केले आहे. लस घेण्यासाठी पुढाकार घेतलेल्या लोकांचे आणि इतर लोकांनी ही लस देण्यात मदत केल्यामुळे त्यांनी आभार मानले आहेत. जॉन्सन म्हणाले, '8 महिन्यांत दोन तृतीयांश वयस्कर लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. जे पुढे आले आणि इतरांना मदत केली त्या प्रत्येकाचे आभार. आपल्यामुळेच आम्ही पुढील आठवड्यात काळजीपूर्वक निर्बंध कमी करण्यात सक्षम झालो आहोत. आपले वय 18 वर्षांपेक्षा जास्त असल्यास आपल्या दोन्ही डोस आत्ताच बुक करा.'

जगभरात रुग्णांची संख्या 18.91 कोटींवर 
गेल्या 24 तासांत जगात कोरोना संसर्गाची 5.54 लाख नवीन प्रकरणे समोर आली आहेत. 3.70 लाख लोक बरे झाले आणि 8,715 लोकांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी आकडेवारी समोर आल्यानंतर जगातील एकूण संक्रमित लोकांची संख्या 18.91 कोटींवर गेली आहे. त्यापैकी 17.27 कोटी लोक बरे झाले आहेत. तर 40.74 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: britain delta variant covid cases rises in britain 40000 new cases after january

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.