CoronaVirus News : ब्रिटननं १ जूनपर्यंत वाढवला लॉकडाऊन; 'स्टे होम'ऐवजी 'स्टे अलर्ट'ची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 09:43 AM2020-05-11T09:43:16+5:302020-05-11T09:45:14+5:30

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लॉकडाऊन वाढवत असल्याचं जाहीर केलं आहे. 

Britain extends lockdown until June 1; PM's suggestion to stay alert vrd | CoronaVirus News : ब्रिटननं १ जूनपर्यंत वाढवला लॉकडाऊन; 'स्टे होम'ऐवजी 'स्टे अलर्ट'ची सूचना

CoronaVirus News : ब्रिटननं १ जूनपर्यंत वाढवला लॉकडाऊन; 'स्टे होम'ऐवजी 'स्टे अलर्ट'ची सूचना

Next
ठळक मुद्देकोरोनानं जगभरात हाहाकार माजवलेला असून, अनेक देश त्याला थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन केलेलं आहे. तर काही देशांनी लॉकडाऊनमधल्या अटी शिथिल केलेल्या आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या ब्रिटननं 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

लंडन : कोरोनानं जगभरात हाहाकार माजवलेला असून, अनेक देश त्याला थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन केलेलं आहे. तर काही देशांनी लॉकडाऊनमधल्या अटी शिथिल केलेल्या आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या ब्रिटननं 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लॉकडाऊन वाढवत असल्याचं जाहीर केलं आहे. 

स्टे अलर्ट सिस्टमद्वारे आम्ही संक्रमित व्यक्तींना शोधून काढत आहोत. जर कोणाला वर्क फ्रॉम होम करायचे नसेल तर ते कार्यालयात जाऊ शकतात, परंतु सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे टाळलं पाहिजे. लोकांना उद्यानात सोडता येईल. तसेच 1 जूनपर्यंत शाळा बंद राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. परदेशातून प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाला अटकाव घालण्यासाठी टाळेबंदी गरजेची असल्याचे सांगत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा बोरिस यांनी केल्याचं सांगितलं आहे.

या काळात कोणतेही कठोर नियम केले जाणार  नाहीत, असेही ते म्हणाले आहेत. तसेच पंतप्रधानांनी 'स्टे होम' ऐवजी 'स्टे अलर्ट' अशी घोषणा दिली आहे. 1 जुलैपासून सार्वजनिक ठिकाणे उघडली जातील. 28 मेपर्यंत स्कॉटलंडमध्ये लॉकडाऊन लागू होईल. विशेष म्हणजे अमेरिकेच्या जॉर्जियामध्ये अनावश्यक उद्योगांना उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. युरोपियन देश नॉर्वेमध्ये शाळा उघडल्या गेल्या आहेत. न्यूझीलंडचे पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांनी कोरोनावर मात केली आहे. युरोपमधील अन्य काही देशही हळूहळू लॉकडाऊन शिथिल करण्याच्या विचारात आहेत. जगभरात कोरोना संक्रमितांची संख्या 41 लाखांच्या वर गेली आहे. तर आतापर्यंत जगात 2 लाख 82 हजार 495 लोकांचा मृत्यू झाला आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : पाकिस्तानमध्ये संक्रमितांची संख्या 33 हजारांच्या पार; 'स्मार्ट लॉकडाऊन' राबवण्याच्या तयारीत

पाक दहशतवादी आज काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याची शक्यता; ११ मे हाच दिवस का निवडला?

गिलगिट-बाल्टिस्‍तानवर भारताच्या 'मास्‍टरस्‍ट्रोक'ला सिक्कीममधील संघर्षातून चिनी उत्तर, तज्ज्ञांचा दावा

ड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज

Coronavirus: येत्या ३० दिवसांत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या साडेपाच लाखांपर्यंत पोहचू शकते – रिपोर्ट

Web Title: Britain extends lockdown until June 1; PM's suggestion to stay alert vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.