भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 07:08 PM2024-11-16T19:08:01+5:302024-11-16T19:08:48+5:30
यावेळी त्यांनी गेल्या शंभर वर्षांतील भारताच्या प्रगतीचे कौतुक केले आणि ती जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावत असल्याचे म्हटले आहे.
पाश्चात्य देश गंभीर संकटात आहेत आणि भारताने ब्रिटिश अर्थव्यवस्थेला मागे टाकले आहे. जेथे अनेक महत्त्वपूर्ण आर्थिक धोरणे आणि सुधारणा झाल्या आहेत, असे ब्रिटनच्या माजी पंतप्रधान एलिझाबेथ ट्रस यांनी शनिवारी हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिटमध्ये म्हटले आहे.
ट्रस म्हणाल्या, "तंत्रज्ञान आणि कृषीसारख्या क्षेत्रात भारत आणि ब्रिटन यांच्यात खूप काही साध्य करता येऊ शकते. यावेळी त्यांनी गेल्या शंभर वर्षांतील भारताच्या प्रगतीचे कौतुक केले आणि ती जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावत असल्याचे म्हटले आहे.
भविष्य काळातील नेतृत्वात भारताचे स्थान महत्त्वाचे असेल -
भविष्यातील भारताच्या भूमिकेसंदर्भात बोलताना ट्रस म्हणाले, “भारत आता जगातील सर्वात मोठी लोकसंख्या आणि दीर्घकाळापासून लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणारा देश आहे. भविष्य काळातील नेतृत्वात त्याचे महत्त्वाचे स्थान असेल, जे खूप उत्साहवर्धक आहे." एवढेच नाही, तर चीनचा वाढता धोका लक्षात घेत, क्वाडमध्ये भारताचा सहभाग अत्यंत महत्वाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ब्रिटिश अर्थव्यवस्थेवर ट्रस यांचे भाष्य -
ट्रस यांनी ब्रिटिश अर्थव्यवस्थेसंदर्भात निराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, ब्रिटिश अर्थव्यवस्था लवकरात लवकर सावरेल, असे मला वाटत नाही. ब्रिटनमधील शक्तिशाली नोकरशाहीवर नियंत्रण आणल्याशिवाय सर्वकाही सुरळीत होणार नाही, असेही त्या म्हणाल्या.