TATA कंपनीला ब्रिटिशांचा 'टाटा'; मिळणार नाही बेलआऊट पॅकेज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 11:31 AM2020-08-16T11:31:59+5:302020-08-16T11:33:11+5:30
ब्रिटन सरकारने हात झटकल्य़ाने टाटा ग्रुपला आता खासगी फायनान्सवर अवलंबून रहावे लागणार आहे. मात्र, जरी ही बोलणी फिस्कटली असली तरीही टाटा स्टीलला सरकारी कर्ज मिळू शकते.
नवी दिल्ली : ब्रिटनच्या सरकारने टाटा ग्रुपच्या कंपन्या जग्वार लँड रोव्हर (JLR) आणि टाटा स्टील (Tata Steel) यांना बेलाऊट पॅकेज देण्यास नकार दिला आहे. टाटा कंपनीची सरकारसोबतची चर्चा बंद झाली आहे. टाटाकडे पुरेसा पैसा असून सराकारी बेलआऊट पॅकेजची गरज नसल्याचे ब्रिटन सरकारचे म्हणणे आहे.
टाटा कंपन्यांना दिलासा देण्यास ब्रिटन सरकारने नकार दिल्याचे वृत्त फाइनांशियल टाइम्सने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. ब्रिटन सरकारने हात झटकल्य़ाने टाटा ग्रुपला आता खासगी फायनान्सवर अवलंबून रहावे लागणार आहे. मात्र, जरी ही बोलणी फिस्कटली असली तरीही टाटा स्टीलला सरकारी कर्ज मिळू शकते. यावर ब्रिटनच्या अर्थ मंत्रालयाने सांगितले की, खासगी कंपन्यांवर आम्ही माहिती देत नाही.
टाटा ग्रुपच्या या दोन्ही कंपन्या सध्या आर्थिक संकटात आहेत. यामुळे त्यांना आता या संकटातून बाहेर पडण्यासाठी खासगी फायनान्सवर अवलंबून रहावे लागणार आहे. दुसरीकडे जेएलआर संकटात असताना कंपनीचा राजीनामा देणार असलेले प्रमुख राल्फ स्पेट यांच्या वेतनात गेल्या वर्षी 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यांचा पगार 4.44 दशलक्ष पौंड झाला आहे. त्यांचा पगार अशावेळी वाढविण्यात आला जेव्हा कंपनी खर्चात कपात करत होती. कंपनीने कॉस्ट कटिंगचे लक्ष्य वाढवून 2.5 अब्ज पौंड केले आहे. तर हजारो लोकांना नोकरीवरून काढले आहे. गेल्या चार वर्षांत राल्फ यांची एकूण कमाई 1.8 कोटी पौंड झाली आहे. कोरोनामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
भयावह! देशात कोरोनाबळींचा आकडा 50000 समीप; दिवसभरात 63 हजार नवे रुग्ण
मैदान सोडलय, क्रिकेट नाही! धोनीच्या नव्या कंपनीचे मुंबईत ऑफिस; कानोकान खबर नाही
चीनला दणका! अमेरिका तैवानला देणार लढाऊ विमानांची फौज
SBI मध्ये विनापरीक्षा नोकरीसाठी अर्ज केला का? आज शेवटचा दिवस
EPFO मध्ये भ्रष्टाचार; कंपनीकडून 8 लाखांची लाच घेताना सीबीआयची धाड
Video: पुणे! "तुमच्या राज्यात विनापरवानगी आलो"; राज्यपालांची अजित पवारांना कोपरखळी
Independence Day : मुलींचे लग्नाचे वय बदलणार; पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून दिले संकेत