अमेरिकेने ड्रोन पाडल्याने तणाव; इराणकडून इंग्लंडचा तेल टँकर जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 10:22 AM2019-07-20T10:22:05+5:302019-07-20T10:24:55+5:30

इराणचे रिव्होल्यूशनरी गार्डनी ही कारवाई केली. युकेचा झेंडा असलेले स्टेना इम्पेरो या तेलवाहू जहाजाला आंतरराष्ट्रीय सीमेमध्ये असताना हेलिकॉप्टर आणि चार जहाजांच्या मदतीने घेरण्यात आले.

Britain oil tankers seized from Iran | अमेरिकेने ड्रोन पाडल्याने तणाव; इराणकडून इंग्लंडचा तेल टँकर जप्त

अमेरिकेने ड्रोन पाडल्याने तणाव; इराणकडून इंग्लंडचा तेल टँकर जप्त

Next

अमेरिकेने इराणचे ड्रोन विमान पाडल्याचा दावा केल्यानंतर पुन्हा होरमुज खाडीक्षेत्रामध्ये तणाव निर्माण झाला आहे. यानंतर इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी इंग्लंडचा एक तेलवाहू टँकर आणि काही मालवाहू जहाजे जप्त केली आहेत. इंग्लंडच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. 


इराणचे रिव्होल्यूशनरी गार्डनी ही कारवाई केली. युकेचा झेंडा असलेले स्टेना इम्पेरो या तेलवाहू जहाजाला आंतरराष्ट्रीय सीमेमध्ये असताना हेलिकॉप्टर आणि चार जहाजांच्या मदतीने घेरण्यात आले. यानंतर या जहाजावर ताबा घेण्यात आला. या टँकरमध्ये एकूण 23 कर्मचारी असून यामध्ये भारतीय नागरिकही आहेत, असे इंग्लंडने प्रसिध्दी पत्रकामध्ये म्हटले आहे. 


इराणच्या गार्डनी त्यांच्या वेबसाईटवरही ही माहिती दिली आहे. यामध्ये सांगितले की, या जहाजाला आंतरराष्ट्रीय जलमार्ग कायदे न पाळल्याने जप्त करण्यात आले आहे. या जहाजाला इराणच्या बंदरावर ठेवले जाणार आहे. इंग्लंडचे सरकार किंवा जहाजाच्या कंपनीचा अद्याप जहाजाशी संपर्क झालेला नाही. 


इराणला या कृत्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील
इंग्लंडने हे प्रकरण गंभीरतेने घेतले असून इराणला इशारा दिला आहे. परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट यांनी सांगितले की, इराणने जर लवकरात लवकर जहाज सोडले नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. आमचे राजदूत इराणसोबत संपर्कात आहेत. 

Web Title: Britain oil tankers seized from Iran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.