Britain PM Election Updates: पंतप्रधानपदाच्या जवळ पोहोचले ऋषी सुनक, दुसऱ्या फेरीत मिळाली सर्वाधिक मते

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 09:49 PM2022-07-14T21:49:59+5:302022-07-14T21:50:36+5:30

Britain PM Election Updates: लंडनमध्ये कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या मतदानात ऋषी सुनक हे सलग दुसऱ्यांदा सर्वाधिक मतांसह आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरीच्या मतदानात ऋषी सुनक यांना 101 मते मिळाली.

Britain PM Election Updates: Rishi Sunak won next round election, near in Britain PM race | Britain PM Election Updates: पंतप्रधानपदाच्या जवळ पोहोचले ऋषी सुनक, दुसऱ्या फेरीत मिळाली सर्वाधिक मते

Britain PM Election Updates: पंतप्रधानपदाच्या जवळ पोहोचले ऋषी सुनक, दुसऱ्या फेरीत मिळाली सर्वाधिक मते

googlenewsNext

Britain PM Election Updates: भारतीय वंशाचे ब्रिटिश राजकारणी ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होण्याच्या एक पाऊल पुढे गेले आहेत. आज लंडनमध्ये कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या मतदानात ऋषी सुनक हे सलग दुसऱ्यांदा सर्वाधिक मतांसह आघाडीवर आहेत. या दुसऱ्या फेरीच्या मतदानात ऋषी सुनक यांना 101 मते मिळाली.

आता ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत 5 उमेदवार उरले आहेत. गुरुवारी ब्रिटिश संसदेच्या 358 खासदारांनी पंतप्रधानपदासाठी 6 उमेदवारांना मतदान केले. या 6 उमेदवारांमध्ये ऋषी सुनक, पेनी मॉर्डंट, लिड ट्रॉस, कॅमी बेडनौक, टॉम टुजेंट आणि भारतीय वंशाच्या सुएला ब्रेव्हरमन यांचा समावेश होता. आजच्या निकालानंतर भारतीय वंशाची सुएला ब्रेव्हरमन शर्यतीतून बाहेर पडल्या. दुसऱ्या फेरीच्या मतदानात सुएला ब्रेव्हरमन यांना केवळ 27 मते मिळाली.

गुरुवारी झालेल्या मतदानात पेनी मॉर्डंट यांना 83, लिझ ट्रास यांना 64, कॅमी बेडेनॉक यांना 49 आणि टॉम तुझांट यांना 32 मते मिळाली. आता या 5 उमेदवारांपैकी आणखी 3 उमेदवार बाद होतील, त्यानंतर मुख्य लढत 2 उमेदवारांमध्ये होईल. त्यासाठी पुढील आठवड्यात मतदान होणार आहे. आता दुसऱ्या फेरीत बाहेर पडलेल्या सुएला ब्रेव्हरमनला कोणाला पाठिंबा देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी पहिल्या फेरीच्या मतदानात ऋषी सुनक यांना 88 मते मिळाली होती. तेव्हा ते पहिल्या क्रमांकावर होते.

Web Title: Britain PM Election Updates: Rishi Sunak won next round election, near in Britain PM race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.