Coronavirus : इंग्लंडचे राजघराणेही कोरोनाच्या विळख्यात, प्रिन्स चार्ल्स कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 04:36 PM2020-03-25T16:36:04+5:302020-03-25T18:07:42+5:30

लंडन : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार घातला आहे. जगातील जवळपास 194  देश कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. यातच आता इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांनाही कोरोनाची लागण झाल्येचे समोर आले आहे. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजते.

Britain Prince Charles Tests Positive for Coronavirus sna | Coronavirus : इंग्लंडचे राजघराणेही कोरोनाच्या विळख्यात, प्रिन्स चार्ल्स कोरोना पॉझिटिव्ह

Coronavirus : इंग्लंडचे राजघराणेही कोरोनाच्या विळख्यात, प्रिन्स चार्ल्स कोरोना पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देस्कॉटलंडमध्ये करण्यात आली प्रिन्स चार्ल्स यांची कोरोना टेस्ट प्रिन्स चार्ल्स आणि पत्नी कामिला एकांतवासात प्रिन्स नेमके कोठे कोरोना व्हायरसच्या संपर्कात आले यांची माहिती अद्याप मिळालेली नाही

लंडन : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार घातला आहे. जगातील जवळपास 194  देश कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. यातच आता इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांनाही कोरोनाची लागण झाल्येचे समोर आले आहे. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजते.

प्रिन्स चार्ल्स कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आता इंग्लंडच्या राजघराण्यातही करोनाने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. 71 वर्षीय प्रिन्स चार्ल्स यांची कोरोना टेर्सट पॉझिटिव्ह आल्याचे, क्लेरेंस हाउसने बुधवार घोषित केले आहे. मात्र त्यांची प्रकृती चांगली आहे. प्रिन्स चार्ल्स यांची कोरोना टेस्ट स्कॉटलँडमध्ये करण्यात आली. ते येथे पत्नी कामिला यांच्यासोबत होते मात्र, कामिला यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. 

क्लेरेंस हाउसच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रिन्स आणि कामिला यांनी स्कॉटलंडमध्ये घरात स्वतःला आयसोलेट करून घेतले आहे. मात्र अद्याप प्रिन्स नेमके कोठे कोरोना व्हायरसच्या संपर्कात आले यांची माहिती मिळालेली नाही.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी तीन आठवड्यासाठी देशात तीन आठवड्यांसाठी लॉकडाउन केले आहे. येथे जवळपास 8 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली असून 400 वर लोकांचा मृत्यू झाला आहे.

इंग्लंडच्या महाराणी एलिजाबेथ दुसऱ्या यांनी यापूर्वीच बर्मिंगहम पॅलेस सोडला आहे. त्यांना विंडसर कॅसल येथे नेण्यात आले आहे.

Web Title: Britain Prince Charles Tests Positive for Coronavirus sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.