ब्रिटनला मिळणार नवा राजा! किंग चार्ल्सला कॅन्सर, नास्त्रेदामसची भविष्यवाणी खरी ठरणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 09:34 PM2024-02-07T21:34:41+5:302024-02-07T21:35:59+5:30
चार्ल्सना कॅन्सर झाल्याचे समजताच त्यांच्यावर उपचार सुरु केले गेले आहेत. ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनाही केली जात आहे.
जगविख्यात भविष्यवेत्ता नास्त्रेदामसची आणखी एक भविष्यवाणी खरी ठरण्याच्या मार्गावर आहे. बकिंगहम पॅलेसने किंग चार्ल्स यांना कॅन्सर डिटेक्ट झाल्याची घोषणा सोमवारी केली होती. यानंतर ब्रिटनला नवा राजा मिळणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. यातच नास्त्रेदामसने शेकडो वर्षांपूर्वी केलेली भविष्यवाणी देखील चर्चेत आली आहे.
चार्ल्सना कॅन्सर झाल्याचे समजताच त्यांच्यावर उपचार सुरु केले गेले आहेत. ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनाही केली जात आहे. परंतु त्यांचे वय आणि आजारपण पाहता नवीन राजा येण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नास्त्रेदामसने एका भविष्यावाणीमध्ये राजाला त्याचे पद सोडावे लागेल व प्रिंस हॅरी सिंहासन सांभाळेल असे म्हटले होते. नास्त्रेदामसच्या भविष्यवाण्या या कवितेत असायच्या, ज्यांचा अर्थ लावला जातो. नास्त्रेदमस: द कम्प्लीट प्रोफेसीज़ फॉर द फ़्यूचर हे पुस्तक लिहिणारे ब्रिटिश लेखक मारियो रीडिंग यांनी याचे विश्लेशन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार असा व्यक्ती राजा बनू शकतो, ज्याचा विचार केला गेला नसेल.
महाराणी एलिझाबेथ यांचे २०२२ मध्ये निधन झाले होते. याचीही नास्त्रेदामसने भविष्यवाणी केली होती. या भविष्यकाराने ब्रिटिश राजघराण्यासंबंधी अनेक भविष्यवाण्या केलेल्या आहेत. याच दरम्यान, किंग चार्ल्स यांचा छोटा मुलगा व शाही परिवारापासून विभक्त झालेला प्रिन्स हॅरी मंगळवारी लंडनला पोहोचला आहे. अभिनेत्री पत्नी मेघन देखील त्यांच्यासोबत आहे. हे जोडपे सध्या अमेरिकेत स्थायिक झालेले आहे.