विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पण आदेशावर ब्रिटनची स्वाक्षरी, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 09:44 PM2019-02-04T21:44:51+5:302019-02-04T21:59:29+5:30
भारतातील बँकांचे तब्बल 9 हजार कोटींचे कर्ज थकवून ब्रिटनमध्ये पसार झालेल्या किंगफिशरच्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पण करारावर ब्रिटनच्या गृह सचिवांनी स्वाक्षरी केली आहे.
ब्रिटन : भारतातील बँकांचे तब्बल 9 हजार कोटींचे कर्ज थकवून ब्रिटनमध्ये पसार झालेल्या किंगफिशरच्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पण करारावर ब्रिटनच्या गृह सचिवांनी स्वाक्षरी केली आहे. यामुळे भारताच्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.
कर्जबुडव्या विजय मल्ल्याची जवळपास 13 हजार कोटींची संपत्ती जप्त केल्याचा दावा केंद्र सरकारने नुकताच केला होता. यावर विजय मल्ल्या यानेही दुजोरा देत उलट्या बोंबा मारल्या होत्या. गेल्या महिन्यातच ब्रिटनमधील न्यायालयाने मल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या खटल्याचा निकाल भारताच्या बाजुने दिला होता.
3 फेब्रुवारीला ब्रिटनच्या सचिवांनी काळजीपूर्वक विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या आदेशावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. भारतामध्ये मल्ल्याविरोधात पैशांची अफरातफर, फसवणूक असे गंभीर गुन्हे आहेत. याची दखल ब्रिटनने घेतली असल्याचे सचिव कार्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.
United Kingdom Home Office: The Home Secretary has formally signed the extradition order for Vijay Mallya. Mallya can formally begin his appeal process. pic.twitter.com/trA3uHbFvK
— ANI (@ANI) February 4, 2019
ब्रिटनच्या गृह सचिवांनी मल्ल्याच्या भारताकडील प्रत्यार्पण आदेशावर स्वाक्षरी जरी केली असली तरीही मल्ल्याचे या विरोधात अपिल करण्याचे दरवाजे उघडले आहेत. आता मल्ल्या वरच्या न्यायालयामध्ये पुढील 14 दिवसांत प्रत्यार्पण आदेशाला आव्हान देऊ शकणार आहे.
Vijay Mallya has 14 days from today to apply for leave to appeal https://t.co/hsNsD8ZAip
— ANI (@ANI) February 4, 2019