ब्रिटिश सैनिकांकडून घडली मोठी चूक! शरणार्थी समजून 'तालिबानी दहशतवाद्याला'च नेलं; मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 06:44 PM2021-09-11T18:44:51+5:302021-09-11T18:45:56+5:30

ब्रिटिश पोलिसांनी पकडण्यात आलेल्या अफगाण नागरिकांची ओळख अद्याप जाहीर केलेली नाही. हा तालिबानी 21 ऑगस्टला पत्नी आणि मुलांसह इग्लंडमध्ये पोहोचला आहे.

British anti terrorism police arrest afghan national in manchester as a suspected taliban terrorist | ब्रिटिश सैनिकांकडून घडली मोठी चूक! शरणार्थी समजून 'तालिबानी दहशतवाद्याला'च नेलं; मग...

ब्रिटिश सैनिकांकडून घडली मोठी चूक! शरणार्थी समजून 'तालिबानी दहशतवाद्याला'च नेलं; मग...

Next

लंडन - इंग्लंडच्या दहशतवादविरोधी पोलिसांनी मँचेस्टर येथून  एका संशयित तालिबानी दहशतवाद्याला अटक केली. हा अफगाण नागरिक त्याच्या कुटुंबासह ब्रिटिश लष्कराच्या बचाव कार्यातील विमानाने निर्वासित म्हणून इंग्लंडमध्ये पोहोचला होता. पोलिसांनी म्हटले आहे, की हा दहशतवादी कोरोना प्रोटोकॉलमुळे काबूलमधून बाहेर काढल्यानंतर मँचेस्टरमधील एका क्वारंटाईन हॉटेलमध्ये होता. पकडला गेलेला हा अफगाण नागरिक, तालिबानचा गुप्तहेर असल्याचा दावा केला जात आहे. (British anti terrorism police arrest afghan national in manchester as a suspected taliban terrorist)

ब्रिटिश सैन्यानेच दिली होती जागा - 
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, या 33 वर्षीय अफगाण नागरिकाने आपल्या देशाच्या विशेष दलासोबत आणि ब्रिटिश सैनिकांसोबतही काम केले आहे. जेव्हा काबूलवर तालिबानने कब्जा केला, तेव्हा त्याला इंग्लंडच्या रॉयल एअर फोर्सने एअरलिफ्ट केले होते. या दहशतवाद्याला या विमानात वादग्रस्त पद्धतीने जागा देण्यात आली होती आणि ब्रिटीश सैन्याची सेवा करणाऱ्या अनेक विश्वासू अनुवादकांना काबूलमध्येच सोडण्यात आले.

पाकिस्तानच्या हाती लागला अफगाणिस्तानचा सिक्रेट खजिना? ISI नं 3 विमानात भरून नेले दस्तऐवज!

पोलिसांनी गुप्त ठेवली आहे ओळख - 
ब्रिटिश पोलिसांनी पकडण्यात आलेल्या अफगाण नागरिकांची ओळख अद्याप जाहीर केलेली नाही. हा तालिबानी 21 ऑगस्टला पत्नी आणि मुलांसह इग्लंडमध्ये पोहोचला. यानंतर त्याला कोरोना नियमांनुसार मँचेस्टरमधील पार्क इन हॉटेलमध्ये क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे. अफगाणिस्तान अजूनही इग्लंडच्या लाल यादीत आहे. तेथून येणाऱ्या प्रत्येकाला क्वारंटाइन राहणे अनिवार्यपणे आहे.

31 ऑगस्टला करण्यात आली अटक -
ब्रिटिश दहशतवादविरोधी पोलिसांनी 31 ऑगस्टच्या पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हॉटेलमधील त्याच्या खोलीत प्रवेश केला आणि कुटुंबासह झोपलेल्या या संशयित तालिबानी दहशतवाद्याला अटक करण्यात आली. त्याला लंडनमधील उच्च सुरक्षा असलेल्या एचएमपी बेलमार्शमध्ये ठेवण्यात आले आहे. ही कारवाई अत्यंत संवेदनशील असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ब्रिटिश सैन्याबरोबर काम करणारा हा अफगाण नागरिक तालिबानचा गुप्तहेर होता, असा दावा करण्यात आला आहे.
 

Web Title: British anti terrorism police arrest afghan national in manchester as a suspected taliban terrorist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.