भारतीयांविरोधात ओकली गरळ, ब्रिटीश चॅनलने पाकिस्तानी अभिनेत्याला हाकललं

By admin | Published: September 26, 2016 12:30 PM2016-09-26T12:30:42+5:302016-09-26T12:30:42+5:30

उरी हल्ल्यानंतर भारतातून पाकिस्तानी कलाकारांना हाकलण्याची मागणी जोर धरत आहे. यामध्ये पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश अभिनेता मार्क अन्वरने आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे.

British channel acquitted by British channel Okli garland against Indians | भारतीयांविरोधात ओकली गरळ, ब्रिटीश चॅनलने पाकिस्तानी अभिनेत्याला हाकललं

भारतीयांविरोधात ओकली गरळ, ब्रिटीश चॅनलने पाकिस्तानी अभिनेत्याला हाकललं

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 26- उरी हल्ल्यानंतर भारतातून पाकिस्तानी कलाकारांना हाकलण्याची मागणी जोर धरत आहे. यामध्ये पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश अभिनेता मार्क अन्वरने आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे. 
 
45 वर्षाचा अन्वर आतापर्यंत ब्रिटनच्या 'कोरोनेशन स्ट्रीट शो'मध्ये  शरीफ नजीरची भूमिका साकारत होता. मात्र, त्याने ट्विटरवरून भारतीयांविरोधात इतके घाणेरडे आणि गलिच्छ कमेंट केले की आयटीव्ही चॅनलने त्याचे कमेंट वर्णभेदी असल्याचं सांगत त्याला शो मधूनच हाकललं. इंग्रजी वृत्तपत्र 'मुंबई मिरर'ने अन्वरने केलेल्या घाणेरड्या ट्विट्सचा स्क्रिनशॉट काढून प्रसारीत केले होते. 
 
मार्क अन्वरने ट्विटरवरून भारतीयांना अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहिली. भारतीय आमच्या काश्मीरी लोकांना मारत आहेत. पाकिस्तानात भारतीय चित्रपटांवर बंदी आणली पाहिजे असं ट्वीट त्याने केलं आहे. भारताविषयी जेवढा राग त्याच्या मनात आहे त्यापेक्षा जास्त राग भारतात काम करणा-या पाकिस्तानी कलाकारांवर आहे.  पाकिस्तानी कलाकारांना भारतात जायची गरज काय, त्यांनी भारत सोडावा, त्यांचं पैशावर जास्त प्रेम आहे असे ट्वीट करत अन्वरने पाकिस्तानी कलाकारांवरही आगपाखड केली. 

Web Title: British channel acquitted by British channel Okli garland against Indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.