ब्रिटनला भीती, ISIS करु शकतं केमिकल हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2017 08:33 AM2017-01-02T08:33:21+5:302017-01-02T08:33:21+5:30
जगातील सर्वात धोकायदायक दहशतवादी संघटनांपैकी एक आयसीस ब्रिटनमध्ये केमिकल हत्यारांसिहत हल्ल्याची योजना आखत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 2 - जगातील सर्वात धोकायदायक दहशतवादी संघटनांपैकी एक आयसीस ब्रिटनमध्ये केमिकल हत्यारांसिहत हल्ल्याची योजना आखत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. युकेमधील मंत्री बेन वॉलेस यांनी हल्ल्याची चिंता व्यक्त केली आहे. आयसीसला मोठ्या प्रमाणावर लोकांची हत्या करायची असून, त्यासाठी केमिकल हत्यारांसहित हल्ला करण्याची तयारी सुरु असल्याची चिंता बेन वॉलेस यांनी बोलून दाखवली आहे.
'द संडे टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत बेन वॉलेस यांनी आपण 'गुप्तचर यंत्रणांशी यासंबंधी चर्चा केली असून त्यांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. त्यांचा मुकाबला करण्यासाठी सर्व तयारी झाली आहे,' असं सांगितलं. 'आयसीसकडून सिरिया आणि इराकमध्ये केमिकल हत्यारांच्या वापराची माहिती याआगोदर समोर आली आहे. त्यामुळे ब्रिटनमध्येदेखील केमिकल हत्यारांचा वापर होण्याची शक्यता आहे,' असंही ते बोलले आहेत.
आपल्या वक्तव्याला दुजोरा देण्यासाठी बेन वॉलेस यांनी मोरक्को येथे फेब्रुवारीत अटक झालेल्या आयसीस दहशतवाद्याचा संदर्भ दिला. 'मोरक्को येथे अटक करण्यास आलेल्या आयसीसच्या दहशतवाद्याकडून जे सामान जप्त करण्यात आलं आहे, त्याचा वापर हत्यार केमिकल हत्यार तयार करण्यासाठी केला जातो,' असं त्यांनी सांगितलं आहे.
आयसीस आता ब्रिटनला आपल्या निशाण्यावर ठेवण्याचा प्लान आखत आहे. आयसीसशी लढण्यासाठी तब्ब्ल 800 ब्रिटिश सैनिक सिरियामध्ये गेले होते, पण त्यातील अर्ध्याहून कमी सैनिक परत येऊ शकले. तब्बल 100 सैनिकांची हत्या करण्यात आली.