ब्रिटन संकटात! पंतप्रधानांनंतर आरोग्यमंत्र्यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 09:03 PM2020-03-27T21:03:16+5:302020-03-27T21:12:59+5:30
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिसदेखील कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकांतवासात आहेत. यापूर्वी प्रिन्स चार्ल्स यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तेही सध्या स्कॉटलंडच्या महालात एकांतवासात आहेत. ते तेथूनच आपले काम करत आहेत.
लंडन - ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्यानंतर आता आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांचीदेखील कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी नागरिकांना घरूनच काम करण्याचे आवाहन केले आहे. तसेच आपणही या संकटाच्या काळात काम सुरूच ठेवणार असल्याचे म्हटले आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिसदेखील कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकांतवासात आहेत. यापूर्वी प्रिन्स चार्ल्स यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तेही सध्या स्कॉटलंडच्या महालात एकांतवासात आहेत. ते तेथूनच आपले काम करत आहेत.
मॅट हँकॉकही एकांत वासात -
हँकॉक यांनी ट्विट करत, 'वैद्यकीय सल्लागारांनी सांगितल्याप्रमाणे, माझीही कोरोना टेस्ट करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली आहे. मात्र माझ्यात कोरोनाचे लक्षण कमी आहेत. मी घरून काम करत आहे आणि एकांतवासात आहे. ज्यांना घरून काम करणे शक्य आहे त्यांनी घरूनच काम करावे,' असे म्हटले आहे.
Following medical advice, I was advised to test for #Coronavirus.
— Matt Hancock (@MattHancock) March 27, 2020
I‘ve tested positive. Thankfully my symptoms are mild and I’m working from home & self-isolating.
Vital we follow the advice to protect our NHS & save lives#StayHomeSaveLivespic.twitter.com/TguWH6Blij
ब्रिटनमध्ये आतापर्यंत, 12,000 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यापैकी 578 लोकांचा मृत्यू झाला आहे.
पंतप्रधान, प्रिन्सदेखील कोरोना पॉझिटिव्ह -
अनेक युरोपीयन देशांप्रमाणेच ब्रिटनमध्येही लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. ब्रिटिश पोलीसांनी कोरोनाला रोखण्यासाठी रस्त्यांवर बॅरिकेडींग केली आहे. याशिवाय मानवविरहित एअरक्राफ्टच्या सहाय्याने रस्त्यांवर लक्ष ठेवले जात आहे. एकिकडे प्रिन्स ऑफ वेल्स चार्ल्सदेखील कोरोनाच्या चपाट्यात सापडले आहेत. ते स्कॉटलंडमध्ये एकांतवासात आहेत. तर दुसरीकडे कोरोनाच्या धास्तीने महारानी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांनीही राजमहाल सोडला आहे.
PM मोदींचे ट्विट -
ब्रिटिश पंतप्रधान बोरिस यांना उद्देशून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वट केले आहे, की 'डियर पंतप्रधान बोरिस जॉनसन, आपण एक फायटर आहात. यासंकटावरही आपण मात कराल. मी आपल्यासाठी आणि ब्रिटसाठी प्रार्थना करतो.'