पतीने पत्नीच्या संपूर्ण शरीरावर चाकूने केले सपासप वार, त्यानंतर जे केलं वाचून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 02:21 PM2021-10-19T14:21:54+5:302021-10-19T14:22:52+5:30
‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, इंग्लंडच्या Leicester मध्ये राहणाऱ्या कशिश अग्रवालने त्याच्या पत्नीची निर्दयीपणे हत्या केली होती. यानंतर त्याने पत्नीच्या मृतदेहाची दूर कुठेतरी नेऊन विल्हेवाट लावली होती.
ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या व्यक्तीने त्याच्या पत्नीची निर्दयीपणे हत्या केली होती. दोषी आढळलेल्या भारतीय व्यक्तीचं नाव कशिश अग्रवाल आहे. २८ वर्षीय कशिश अग्रवालने त्याची २९ वर्षीय पत्नी गीतिका गोयलची हत्या केली होती. यानंतर त्याने पत्नी बेपत्ता झाल्याचं नाट्य रचलं होतं. पण त्याचं खोटं जास्त काळ टिकू शकलं नाही.
‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, इंग्लंडच्या Leicester मध्ये राहणाऱ्या कशिश अग्रवालने त्याच्या पत्नीची निर्दयीपणे हत्या केली होती. यानंतर त्याने पत्नीच्या मृतदेहाची दूर कुठेतरी नेऊन विल्हेवाट लावली होती. नंतर त्याने नातेवाईक आणि मित्रांना फोन करून गीतिकाबाबत चौकशी केली. तो म्हणाला की, जेव्हापासून तो ऑफिसमधून आला, तेव्हापासून गीतिका कुठे दिसत नाहीये. यानंतर त्याने पोलिसात गीतिका गायब असल्याची सूचना दिली.
पत्नीला मारल्यानंतर कशिशने तिचा मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून आणि कार मधून दूर घेऊन गेला. त्याने काही अंतरावर मृतदेहाची विल्हेवाट लावली आणि घरी परत आला. याआधी त्याने गीतिकाच्या फोनवर अनेकदा कॉल केले. जेणेकरून पोलिसांना सांगता यावं की, तो पत्नीबाबत किती चिंतेत होता. त्याने पोलिसांना सांगितलं की, ऑफिसमधून आल्यावर तो थेट आंघोळीला गेला. साधारण अर्ध्या तासानंतर त्याला जाणीव झाली की, गीतिका घरात नाहीये. यानंतर त्याने गीतिकाला कॉल केला. पण तिने उचलला नाही.
कसा झाला खुलासा?
हत्याकांडाच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांना एका महिलेचा मृतदेह रस्त्याच्या कडेला सापडला. हा मृतदेह गीतिका गोयलचा असल्याचं समजलं. गीतिकाच्या संपूर्ण शरीरावर चाकूने वार केल्याचे निशाण होते. मृतदेह सापडल्यावर पोलिसांचा संशय कशिशवर होता आणि त्यानंतर चौकशी केली तर सगळं काही समोर आलं. पोलिसांनी कशिशच्या घरातील आणि शेजारचे CCTV फुटेज चेक केले, ज्यात तो हत्येच्या दिवशी कारने कुठेतरी जाताना दिसत होता. त्यासोबत घरात पोलिसांना काही रक्तांचे डागही दिसले.
Leicester Crown Court ने १८ ऑक्टोबरला याप्रकरणी निर्णय देत कशिश अग्रवालला त्याच्या पत्नीच्या हत्येचा दोषी ठरवलं आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याला २० वर्ष आणि ६ महिने तुरूंगात रहावं लागेल. तेच गीतिकाचा परिवार या घटनेमुळे धक्क्यात आहे. ते म्हणाले की, यावर विश्वास बसत नाहीये की, कशिश त्याच्या पत्नीची हत्या करू शकतो. परिवाराला माहीत नाही की, दोघांमध्ये काय सुरू होतं.