विकीलिक्सच्या ज्युलियन असांजेला 50 आठवड्यांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 05:13 PM2019-05-01T17:13:22+5:302019-05-01T17:15:35+5:30

असांजे हा मूळचा ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे. त्याच्यावर स्वीडनमध्ये लैंगिक शोषणाचे आरोप ठेवण्यात आले होते.

British judge sentences WikiLeaks founder Julian Assange to 50 weeks in prison | विकीलिक्सच्या ज्युलियन असांजेला 50 आठवड्यांची शिक्षा

विकीलिक्सच्या ज्युलियन असांजेला 50 आठवड्यांची शिक्षा

Next

लंडन : ब्रिटनमध्ये जामीन मोडल्याच्या प्रकरणात विकीलिक्सचे सहसंस्थापक ज्युलियन असांजेला 50 आठवड्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ब्रिटीश पोलिसांनी असांजेला गुरुवारी सकाळी ताब्यात घेतले होते. गेल्या 7 वर्षांपासून असांजे लंडनमधील इक्वेडोरच्या दुतावासमध्ये आश्रयाला होता. इक्वेडोरने त्यांना दिलेला राजनैतिक आश्रय काढून घेतला होता. यानंतर तेथील राजदुतांनी पोलिसांना बोलावून अटक करायला लावली. 

असांजे हा मूळचा ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे. त्याच्यावर स्वीडनमध्ये लैंगिक शोषणाचे आरोप ठेवण्यात आले होते. याविरोधात लंडनच्या वेस्टमिंस्टर मजिस्ट्रेट न्यायालयात 29 जून, 2012 अटक वॉरंट जारी केला होता. यानंतर असांजेने इक्वाडोरच्या न्यायालयात शरण घेतली होती. याच प्रकरणात वेस्टमिंस्टर मजिस्ट्रेटच्या न्यायालयाने जामीनाच्या अटी तोडल्यावरून दोषी ठरविले आहे. असांजेने न्य़ायालयात स्वत:ला निर्दोष असल्याचे म्हटले होते. मात्र, न्यायालयाने त्याचे काहीही ऐकले नव्हते. 




अमेरिकेच्या प्रत्यार्पण वॉरंटवर पुढील महिन्यात सुनावणी 
जिल्हा न्यायाधीश मायकल स्नो यांच्या न्यायालयात असांजे यांच्या विरोधात अमेरिकेच्या प्रत्यार्पण वॉरंटवर सुनावणी केली जाणार आहे. न्यायधिशांनी यासाठी 2 मे ला व्हिडीओलिंकद्वारे असांजेला हजर करण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकी न्याय विभागाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लंडन पोलिसांनी या प्रकरणातही असांजेला अटक केली आहे. 


 

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत हस्तक्षेपाचा आरोप
असांजेवर 2016 मध्ये झालेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप लावला आहे. त्याची वेबसाईट विकीलिक्सने राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार हिलेरी क्लिंटन आणि डेमॉक्रेटीक नॅशनल कमिटीचे हजारो ईमेल प्रसिद्ध केले होते. याचा परिणाम राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवरही झाला होता. त्यांच्याविरोधात रशियन हॅकर्सच्या मदतीने क्लिंटन आणि डेमॉक्रेटीक पक्षाच्या कॉम्प्युटरमधून दस्तावेज चोरी केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात अमेरिकी न्याय विभागाने जुलैमध्ये 12 रशियन गुप्तहेरांना आरोपी बनविले होते.

Web Title: British judge sentences WikiLeaks founder Julian Assange to 50 weeks in prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.