ब्रिटनच्या पंतप्रधानांनी केली राजीनाम्याची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 04:46 AM2019-05-25T04:46:24+5:302019-05-25T04:46:28+5:30
लंडन : आपल्या ‘ब्रेकिझट’ प्रस्तावास संसद सदस्यांचा पाठिंबा मिळविण्यास अपयश आल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान तेरेसा मे यांनी सत्ताधरी कॉन्झव्हेटिव पक्षाच्या ...
लंडन : आपल्या ‘ब्रेकिझट’ प्रस्तावास संसद सदस्यांचा पाठिंबा मिळविण्यास अपयश आल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान तेरेसा मे यांनी सत्ताधरी कॉन्झव्हेटिव पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा देण्याची शुक्रवारी घोषणा केली.
१०, डाऊनिंग स्ट्रीट या आपल्या निवासस्थानाबाहेर एका निवेदनात मे यांनी ही घोषमा केली तेव्हा त्यांचा कंठ भावनावेगाने दाटून आला होता. ब्रिटनला युरोपीय संघातून बाहेर पडण्यासाठी ‘ब्रेक्झिट’ करार देऊ शकले नाही, याची मला नेहमीच मनापासून खंत वाटत राहील.
मे म्हणाल्या की, ७ जून रोजी मी कॉन्झव्हेटिव व युनियनिस्ट पक्षांच्या नेतेपदाचा राजीनामा देईन. त्यानंतर आठवडाभरात नवा नेता निवडण्याच्या हालचाली सुरु होणे अपेक्षित आहे. नेतेपदाची ही स्पर्धा अनेक आठवडे चालेल, असे दिसते. (वृत्तसंस्था)