Afghanistan Crisis: अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत ब्रिटनच्या पंतप्रधानांचा पाकच्या इम्रान खान यांना फोन, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 07:41 PM2021-08-18T19:41:06+5:302021-08-18T19:41:44+5:30

Boris Johnson Calls Imran Khan on Taliban Issue: अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर पाकिस्तानकडून तालिबानी सरकारला उघड उघड पाठिंबा दिला जात आहे.

British prime minister boris johnson calls to pakistan pm imran khan over afghanistan taliban situation | Afghanistan Crisis: अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत ब्रिटनच्या पंतप्रधानांचा पाकच्या इम्रान खान यांना फोन, म्हणाले...

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत ब्रिटनच्या पंतप्रधानांचा पाकच्या इम्रान खान यांना फोन, म्हणाले...

Next

Boris Johnson Calls Imran Khan on Taliban Issue: अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर पाकिस्तानकडून तालिबानी सरकारला उघड उघड पाठिंबा दिला जात आहे. याच मुद्द्यावरुन ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी फोनवर संवाद साधला आहे. अफगाणिस्तानातील नव्या सरकारला एकतर्फी नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालायला हवी असं जॉन्सन इम्रान खान यांना फोनवर म्हणाले आहेत. 

अफगाणिस्तानातील निर्माण झालेल्या संकटावर रणनिती आखण्यासाठी जॉन्सन आंतरराष्ट्रीय पातळीवर जगभरातील विविध नेत्यांना संपर्क साधत आहेत. यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी चर्चा करण्याआधी बोरिस जॉन्सन यांनी मंगळवारी दुपारी इम्रान खान यांच्याशी चर्चा केली. 

ब्रिटनच्या संसदेनं उन्हाळी सुट्या रद्द करुन विशेष अधिवेशनाचं आयोजन केलं आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी अफगाणिस्तानातील मानवी आपत्तीपासून बचाव करण्यासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबत मिळून काम करण्यासाठी कटिबद्धता व्यक्त केली आहे. 

Web Title: British prime minister boris johnson calls to pakistan pm imran khan over afghanistan taliban situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.