ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचा राजीनामा

By admin | Published: June 24, 2016 01:02 PM2016-06-24T13:02:10+5:302016-06-24T13:06:06+5:30

ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी राजीनामा देणार असल्याचे शुक्रवारी सकाळी जाहीर केले.

British Prime Minister David Cameron resigns | ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचा राजीनामा

ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचा राजीनामा

Next
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 24 - ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी राजीनामा देणार असल्याचे शुक्रवारी सकाळी जाहीर केले. सार्वमतामध्ये ब्रिटिश जनतेने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर देशाला उद्देशून कॅमेरून यांनी भाषण केले. ब्रिटनने युरोपीय महासंघात रहावे या मताचे असलेल्या कॅमेरून यांनी नैतिक पराजय मान्य करत राजीनामा देण्याची घोषणा केली तसेच जनमताचा आदर करत युरोपीय महासंघातून वेगळे होण्याच्या दृष्टीने वाटचाल केली जाईल याची हमी दिली.
कॅमेरून हे तीन महिने पंतप्रधानपदी राहतिल आणि त्यानंतर पायउतार होतील. या काळात ब्रिटनच्या भावी पंतप्रधानाचा निर्णय केला जाईल.
 
ब्रिटनमधील जनतेने ऐतिहासिक कौल देत युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
 
युरोपीय संघातून बाहेर पडावे अशी स्पष्ट सूचना ब्रिटिश जनतेने केली आहे आणि तिचा आदर ठेवायला हवा असे कॅमेरून म्हणाले. येत्या ऑक्टोबरमध्ये कन्झर्वेटिव्ह पक्षाची परीषद होणार असून त्यावेळी नवा नेता कोण असेल ते जाहीर केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
 
23 जूनची इतिहासात स्वातंत्र्यदिवस म्हणून नोंद होऊ दे
 
गेली सहा वर्षे कॅमेरून यांनी ब्रिटनचे पंतप्रधानपद भूषवले असून या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटतो असे त्यांनी छोटेखानी भाषणात सांगितले. तसेच, ब्रिटन ही मूलत: अत्यंत सक्षम अर्थव्यवस्था असून येत्या काळात सगळ्या कठीण गोष्टींचा सामना करत देशाची अर्थव्यवस्था सगळे आघात पचवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
ब्रेग्झिटमुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणा-यांना तब्बल 4 लाख कोटींचं नुकसान झालं आहे.

Web Title: British Prime Minister David Cameron resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.