ब्रिटिशांना उपरती; जालियनवाला बाग हत्याकांडप्रकरणी इंग्लंडच्या पंतप्रधानांनी 100 वर्षांनंतर व्यक्त केला खेद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 06:59 PM2019-04-10T18:59:14+5:302019-04-10T19:00:32+5:30
जालियनवाला बाग हत्याकांडाच्या शताब्दीच्या पूर्वसंध्येला ब्रिटिशांना शंभर वर्षांपूर्वी केलेल्या अत्याचारांची उपरती झाली असून, ब्रिटिश पंतप्रधान टेरेसा मे यांनी या कृत्याबाबत खेद व्यक्त केला आहे.
लंडन - अमृतसरमधील जालियनवाला बाग येथे ब्रिटिशांनी केलेल्या हत्याकांडाला गुरुवारी 100 वर्षे पूर्ण होणार आहेत. दरम्यान, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या शताब्दीच्या पूर्वसंध्येला ब्रिटिशांना शंभर वर्षांपूर्वी केलेल्या अत्याचारांची उपरती झाली असून, ब्रिटिश पंतप्रधान टेरेसा मे यांनी या कृत्याबाबत खेद व्यक्त केला आहे.
भारतीय स्वातंत्र्य संग्राम ऐन बहरात असताना 13 एप्रिल 1919 रोजी पंजाबमधील अमृतसर येथी जालियनवाला बाग येथे बैसाखीनिमित्त हजारो नागरिक जमले होते. यावेळी ब्रिटिश अधिकारी जनरल डायर याने या नागरिकांवर बेछुट गोळीबार केला होता. त्या गोळीबारात शेकडो जण जखमी झाले होते.
AFP: British Prime Minister Theresa May in British Parliament today expressed regret for #JallianwalaBaghMassacre; said, "We deeply regret what happened and the suffering caused." pic.twitter.com/F5CWvDfObg
— ANI (@ANI) April 10, 2019