ब्रिटिश पंतप्रधानांची संसदेत अग्निपरीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 06:30 AM2018-12-11T06:30:50+5:302018-12-11T06:31:15+5:30
युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या (ब्रेक्झिट) कारनाम्याच्या सरकारने तयार केलेल्या मसुद्यावर ब्रिटिश संसदेच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ या कनिष्ठ सभागृहात मंगळवारी होणारे मतदान ही पंतप्रधान तेरेसा मे यांच्यासाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे.
लंडन : युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या (ब्रेक्झिट) कारनाम्याच्या सरकारने तयार केलेल्या मसुद्यावर ब्रिटिश संसदेच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ या कनिष्ठ सभागृहात मंगळवारी होणारे मतदान ही पंतप्रधान तेरेसा मे यांच्यासाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे. संसदेने हा प्रस्ताव फेटाळला तर ‘ब्रेक्झिट’ला खो बसेल एवढेच नव्हे तर मे यांना पंतप्रधानपदही गमवावे लागू शकेल.
दरम्यान, गेली ४६ वर्षे युरोपीय संघाचा सदस्य असलेल्या ब्रिटनने त्यातून बाहेर पडण्याचा औपचारिक प्रस्ताव दिला असला तरी प्रत्यक्ष फारकतीच्या २९ मार्च या नियोजित तारखेपूर्वी ब्रिटन हा प्रस्ताव एकतर्फी मागे घेऊ शकतो, असा निकाल युरोपीय संघाच्या न्यायालयाने सोमवारी दिला.