ब्रिटनमधील संशोधकांना फिजिक्समधील नोबेल जाहीर
By admin | Published: October 4, 2016 04:41 PM2016-10-04T16:41:06+5:302016-10-04T16:41:06+5:30
ब्रिटनमधील संशोधक डेव्हिड थोउलेस, डंकन हेल्डन आणि माइकल कोस्टेरलिड्झ यांना फिजिक्समधील नोबेल जाहीर करण्यात आलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत
स्टॉकहोम , दि. 4 - फिजिक्समधील नोबेल जाहीर करण्यात आलं आहे. ब्रिटनमधील संशोधक डेव्हिड थोउलेस, डंकन हेल्डन आणि माइकल कोस्टेरलिड्झ यांना हे नोबेल जाहीर करण्यात आलं आहे. 'अनयुझूअल स्टेट्स ऑफ मॅटर'वरील संशोधनसाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 1970 आणि 80 च्या दशकात हे संशोधन करण्यात आलं होतं.
सोमवारपासून नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात सुरुवात झाली असून जपानच्या योशिनोरी ओहसुमी यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. ‘ऑटोफॅगी’शी संबंधित त्यांच्या असामान्य कामासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘ऑटोफॅगी’ एक अशी प्रक्रिया आहे ज्यात पेशी स्वत:लाच खाऊन टाकतात. या गुंतागुंतीतून पार्किन्सन आणि मधुमेहासारखे आजार होऊ शकतात. ज्युरींनी सांगितले की, ओहसुमी यांचा शोध वैद्यकशास्त्रातील संशोधनाला नवे परिमाण देणारा आहे.
बुधवारी रसायनशास्त्रामधील तर शुक्रवारी शांततेसाठीचं नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे. अर्थशास्त्र आणि साहित्य पुरस्कार पुढील आठवड्यात जाहीर होणार आहेत.
BREAKING NEWS #NobelPrize in Physics 2016 to David Thouless, Duncan Haldane and Michael Kosterlitz pic.twitter.com/5jw75GIjRv
— The Nobel Prize (@NobelPrize) October 4, 2016