अमेरिकेच्या ‘इसिस’विरोधी कारवाईला ब्रिटनचाही पाठिंबा
By admin | Published: September 28, 2014 03:02 AM2014-09-28T03:02:03+5:302014-09-28T03:02:03+5:30
इस्लामिक स्टेटविरुद्ध अमेरिकेने सुरू केलेल्या कारवाईला ब्रिटन, बेल्जियम आणि डेन्मार्कने शुक्रवारी पाठिंबा दिला.
Next
>लंडन : इस्लामिक स्टेटविरुद्ध अमेरिकेने सुरू केलेल्या कारवाईला ब्रिटन, बेल्जियम आणि डेन्मार्कने शुक्रवारी पाठिंबा दिला. या पाठिंब्यानुसार इराकमध्ये लष्करी कारवाई होईल; परंतु अमेरिकेला सिरियात थेट हस्तक्षेप करता येणार नाही, अशी मर्यादाही या देशांनी घातली.
इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी हजारो मुलतत्ववादी तयार ठेवले असून त्यांनी इराक आणि सिरियाचा फार मोठा भूभाग ताब्यात घेतला आहे. या तीन देशांचा पाठिंबा तसा फार मोठा म्हणता येणार नसला तरी बराक ओबामा यांच्या प्रयत्नांना त्यामुळे बळ मिळणार आहे. अमेरिकेसोबत याआधीच पाच अरब राष्ट्रे, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, नेदरलँडस आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी शनिवारी हा निर्णय घेण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविले होते.
524 सदस्यांनी इराकमध्ये अमेरिकेसोबत हवाई हल्ले करायला एकमुखाने पाठिंबा दिला, तर 43 सदस्यांनी विरोध केला. काही सदस्यांनी मतदानात भागच घेतला नाही.
तत्पूर्वी, कॅमेरून यांनी इस्लामिक स्टेटविरुद्धची लष्करी कारवाई अनेक वर्षे चालू शकेल, असे म्हटले होते व संसद सदस्यांनी कारवाईसाठीच्या ठरावाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले होते. अॅलन हेलिंग आणि जॉन कॅन्टिली हे ब्रिटिश नागरिक त्यांच्या आज ताब्यात आहेत. (वृत्तसंस्था)
डेव्हीड कॅमेरून यांनी आयएसच्या दहशतवाद्यांना ‘मानसिक समतोल बिघडलेले दहशतवादी’ म्हटले आहे.
4न्यूयॉर्क : इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा बीमोड करण्यासाठी अमेरिका स्थापन करीत असलेल्या जागतिक आघाडीत भारत सामील होण्याची शक्यता नाही. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील या आघाडीत 4क् देश सामील झाले आहेत. 4क् भारतीय अजूनही इराकमध्ये बंदिवान असल्याच्या पाश्र्वभूमीवर भारत या आघाडीत सामील होण्याची शक्यता नाही, असे सूत्रंनी सांगितले.
4 तथापि, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यासाठी मोदी यांना पाठिंबा देण्याचे आवाहन करण्याची शक्यता आहे. दहशतवादाबाबत भारताची भूमिका सर्वश्रुत आहे. इसिसच्या ताब्यातील 46 नर्सेसची सुटका करण्यात आम्हाला यश आले. तथापि, 4क् भारतीय अजूनही त्यांच्या ताब्यात ओहत. मोसूल नजीकच्या एका प्रकल्पावर काम करणा:या या भारतीयांचे जूनमध्ये या दहशतवाद्यांनी अपहरण केले होते.