ब्रसेल्स विमानतळ १२ दिवसांनंतर सुरू

By admin | Published: April 4, 2016 02:45 AM2016-04-04T02:45:22+5:302016-04-04T02:45:22+5:30

इसिस’ने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर गेले १२ दिवस बंद असलेले ब्रसेल्सचे विमानतळ रविवारी अंशत: सुरू करण्यात आले

Brussels Airport started after 12 days | ब्रसेल्स विमानतळ १२ दिवसांनंतर सुरू

ब्रसेल्स विमानतळ १२ दिवसांनंतर सुरू

Next

ब्रसेल्स : ‘इसिस’ने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर गेले १२ दिवस बंद असलेले ब्रसेल्सचे विमानतळ रविवारी अंशत: सुरू करण्यात आले. त्यानंतर अथेन्स, ट्युरिन आणि फेरो येथे तीन विमाने रवाना झाली.
अर्थात हे विमानतळ ‘सांकेतिकरीत्या’ खुले करण्यात आले असून, प्रवाशांची कडक झडती घेतली जात आहे. २२ मार्च रोजी दोन इसमांनी आत्मघातकी बॉम्बस्फोट घडविला होता. तेव्हापासून हे विमानतळ बंद ठेवण्यात आले होते. त्याच दिवशी मेट्रो स्टेशनवरही बॉम्बस्फोट झाला होता. या दोन्ही हल्ल्यात एकूण ३२ जण ठार आणि अन्य ३०० जण जखमी झाले होते.

Web Title: Brussels Airport started after 12 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.