ब्रसेल्स; शोधमोहीम वेगात
By admin | Published: March 27, 2016 12:14 AM2016-03-27T00:14:52+5:302016-03-27T00:14:52+5:30
बेल्जियममध्ये धाड आणि अटक सत्रातून फ्रान्समधील हल्ल्याच्या नव्या कटाचा पर्दाफाश झाल्यानंतर पोलिसांनी संशयितांच्या शोध मोहिमेला शनिवारी आणखी गती दिली.
ब्रसेल्स : बेल्जियममध्ये धाड आणि अटक सत्रातून फ्रान्समधील हल्ल्याच्या नव्या कटाचा पर्दाफाश झाल्यानंतर पोलिसांनी संशयितांच्या शोध मोहिमेला शनिवारी आणखी गती दिली.
ब्रसेल्स हल्ल्यानंतर सरकार बचावाच्या पवित्र्यात आहे. विमानतळ व मेट्रोवरील हल्ला रोखण्यासाठी जे शक्य होते ते सर्व आम्ही केले होते, असे प्रमुख मंत्री म्हणत आहेत. काल अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्यानंतर तीन जणांना अटक करण्यात आली. पॅरिस हल्ल्यानंतर नव्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता फ्रान्सचे अधिकारी वर्तवीत असून या तिघांना त्याचसंदर्भात अटक करण्यात आली आहे.
ब्रसेल्स हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. फैसल सी. असे या संशयिताचे नाव आहे. ब्रसेल्स येथील विमानतळ मंगळवारपूर्वी उघडणार नसल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)