अब्जावधी रुपयांच्या गाड्या जळून खाक; मालवाहू जहाजाला प्रवासादरम्यान आग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 07:27 AM2022-02-19T07:27:19+5:302022-02-19T07:27:50+5:30

एका बेंटले कारची किंमत ३ कोटी रुपयांपासून पुढे आहे. त्यामुळे जवळपास ५०० ते ६०० कोटींच्या १८९ कार जळून खाक झाल्या आहेत

Burn cars worth billions of rupees; The cargo ship caught fire during the voyage | अब्जावधी रुपयांच्या गाड्या जळून खाक; मालवाहू जहाजाला प्रवासादरम्यान आग

अब्जावधी रुपयांच्या गाड्या जळून खाक; मालवाहू जहाजाला प्रवासादरम्यान आग

Next

कोरोना महामारीमुळे वाहन उद्योगाची स्थिती नाजूक आहे. कोरोनाचा सर्वाधिक परिणाम पुरवठा साखळीवर झाला. कंपन्यांना वाहने पोहोचवणे सर्वात कठीण जात होते. अशात वाहन उद्योगाचे कंबरडे मोडणारी आणखी एक घटना समोर आली आहे. अब्जावधी रुपयांच्या आलिशान गाड्यांनी भरलेले एक मालवाहू जहाज गुरुवारी अटलांटिक महासागरात जळाले.

कोट्यवधींच्या कार खाक
एका बेंटले कारची किंमत ३ कोटी रुपयांपासून पुढे आहे. त्यामुळे जवळपास ५०० ते ६०० कोटींच्या १८९ कार जळून खाक झाल्या आहेत. एक मालवाहू जहाज जर्मनीहून अटलांटिक महासागरावाटे अमेरिकेत घेऊन जात होते. फेलिसिटी एस नावाच्या या मालवाहू जहाजाला भर समुद्रात अचानक भीषण आग लागली. आग एवढी भीषण होती की, जहाजावरील सर्व वाहने आणि इतर साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने जहाजावीरल २२ क्रू मेंबर्स बचावले.

कोणती किती वाहने होती?

४,००० फोक्सवॅगन कंपनीच्या कार

१८९ फोक्सवॅगनची बेंटले

११०० पोर्शे कार एका पोर्शे  कारची किंमत १ कोटीच्या आसपास आहे. अशा ११०० कार जळाल्या आहेत. त्यांची किंमत ११०० कोटी रुपयांच्या आहे.

यापूर्वी घडले असेच
२०१९ मध्येही असेच घडले होते. ग्रँड अमेरिका हे मालवाहू जहाज २००० लग्झरी कार घेऊन निघाले होते. त्या जहाजाला आग लागली आणि ते पाण्यात बुडाले. त्यातही पोर्शे, ऑडी अशा अलिशान गाड्या होत्या. 

Web Title: Burn cars worth billions of rupees; The cargo ship caught fire during the voyage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग