बरणीत मान अडकलेल्या पिल्लाची अशी झाली सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:48 AM2017-09-18T01:48:16+5:302017-09-18T01:48:21+5:30
कुत्र्याच्या पिल्लाने बिस्किटे खाण्यासाठी काचेच्या बरणीत तोंड घातले खरे, परंतु ते नंतर त्याला काढता येईना. शेवटी अग्निशमन दलाची मदत घ्यावी लागली.
कुत्र्याच्या पिल्लाने बिस्किटे खाण्यासाठी काचेच्या बरणीत तोंड घातले खरे, परंतु ते नंतर त्याला काढता येईना. शेवटी अग्निशमन दलाची मदत घ्यावी लागली. पिल्लाच्या मालकाने त्याची मान डब्यातून काढायचा बराच प्रयत्न केला, पण डोके काही निघाले नाही. मग त्यांनी अग्निशमन दलाला बोलाविले. हॅम्पशायर येथील प्राण्यांची सुटका करणारे तज्ज्ञ फिलीप यांनी पिल्लाला बघितल्यावर, काच फोडून त्याची सुटका करणे जोखमीचे ठरेल, परंतु हातांनी त्याचे डोके हळूहळू मागे घेता येईल, असे सांगितले. प्रत्यक्षात त्यांनी त्या पिल्लाची ढिली झालेली कातडी ओढून त्याची सुटका केली.
फिलीप म्हणाले की, हे काम खूपच वेगळे होते, शिवाय दु:खी पिल्लाकडे पाहणेही अस्वस्थ करणारे होते. काच फोडून त्याची सुटका करता आली असती, पण त्यामुळे पिल्लू जखमी झाले असते. मी त्याची ढिली झालेली कातडी ओढली. त्यामुळे मला त्याचा एक कान बाहेर काढता आला व नंतर दुसरा. मी अनेक वर्षांपासून प्राण्यांच्या सुटका करीत आहे. कधी प्राणी भांड्यात अडकतात, तर कधी आणखी कशात, पण मी त्यांची सुखरूप सुटका करतोच.