बर्निंग ट्रेनमुळे दोन गावे केली रिकामी
By admin | Published: February 18, 2015 01:38 AM2015-02-18T01:38:07+5:302015-02-18T01:38:07+5:30
कच्चे तेल घेऊन जाणारी मालवाहू रेल्वे घसरून आग लागल्यामुळे व्हर्जिनियातील दोन गावे रिकामी करण्यात आली.
वॉशिंग्टन : कच्चे तेल घेऊन जाणारी मालवाहू रेल्वे घसरून आग लागल्यामुळे व्हर्जिनियातील दोन गावे रिकामी करण्यात आली. अंशत: गोठलेल्या नदीजवळून आगीच्या ज्वाळा व धुराचे लोट उठत असल्याची छायाचित्रे स्थानिक संकेतस्थळांनी प्रकाशित केली आहेत. मालगाडीच्या १४ वाघिन्यांची हानी झाली असून एक कानाव्हा नदीत कोसळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या दुर्घटनेत एका व्यक्तीला धुराचा त्रास झाला. याशिवाय अन्य कोणाला काहीही इजा झालेली नाही. अपघात झाल्यानंतर अदेना व बूमर गावातील नागरिकांना गावे रिकामी करण्याचे आवाहन करण्यात आले. तेलाला लागलेली आग अद्यापही नियंत्रणाबाहेर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नदीत पडलेल्या वाघिनीतून तेलाची गळती होत आहे, असे सार्वजनिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले
लॉरेन्स मिस्सीना यांनी सांगितले. व्हर्जिनियाच्या आपत्कालीन, तसेच पर्यावरण विभागाच्या अधिकारी दुर्घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.