कॉफीच्या चोथ्यापासून तयार होणा-या तेलावर धावणार बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 04:21 AM2017-11-24T04:21:35+5:302017-11-24T04:21:58+5:30
कॉफीचं नाव जरी घेतलं तरी ताजंतवाणं वाटतं. पण, लंडनमध्ये याच कॉफीची जरा वेगळ्या अर्थाने चर्चा सुरु आहे. येथील लाल डबर डेकर बस आता चक्क कॉफीच्या टाकाऊ पदार्थांपासून चोथ्यापासून तयार होणा-या तेलावर धावणार आहेत.
कॉफीचं नाव जरी घेतलं तरी ताजंतवाणं वाटतं. पण, लंडनमध्ये याच कॉफीची जरा वेगळ्या अर्थाने चर्चा सुरु आहे. येथील लाल डबर डेकर बस आता चक्क कॉफीच्या टाकाऊ पदार्थांपासून चोथ्यापासून तयार होणा-या तेलावर धावणार आहेत. येथील बायोबिन या कंपनीने यासाठी पुढाकार घेतला आहे. बायोबिनचे संस्थापक अर्थर के यांनी सांगितले की, कॉफीच्या वेस्टेजमध्ये तेलाचा अंश असतो. बायोडिझेल बनविण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. यासाठी बायोबिनने देशाात कोस्टा कॉफी आणि कॅफे नॅरो यासारख्या कॉफी शॉपशी भागीदारी केली आहे. ब्रिटनमध्ये दरवर्षी ५ लाख टन कॉफीचे उत्पादन होते. यातून निर्माण होणार टाकाऊ भाग, चोथा यापासून हे इंधन उपलब्ध होणार आहे. हे इंधन डिझेलमध्ये मिसळून ते बससाठी वापरता येणार आहे. प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्याचा एक भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात येत आहे. अर्थर के म्हणाले की, ज्या भागात कॉफीचे अधिक उत्पादन होते आणि कॉफी अधिक घेतली जाते अशा ठिकाणांवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत.