...म्हणून व्यावसायिकानं जाळले सात कोटी, मिळाली 30 दिवसांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 09:44 AM2020-02-12T09:44:57+5:302020-02-12T09:46:00+5:30
पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर अवलंबून असतं, बऱ्याचदा पती-पत्नींमध्ये भांडणं होतात आणि ती विकोपालाही जातात.
ओटावाः पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर अवलंबून असतं, बऱ्याचदा पती-पत्नींमध्ये भांडणं होतात आणि ती विकोपालाही जातात. या रोजच्या कटकटीतून सोडवणूक करण्यासाठी पती-पत्नी घटस्फोटाचा मार्ग स्वीकारतात. परंतु घटस्फोट घेतल्यानंतरही पतीला पत्नीला पोटगी द्यावी लागते, पण बऱ्याचदा पोटगी देण्यास पती कचरतात. असाच एक प्रकार कॅनडामध्ये उघडकीस आला. घटस्फोट घेतल्यानंतर पत्नीला पोटगीपायी रक्कम द्यावी लागेल म्हणून एका व्यावसायिकानं 7.13 कोटी रुपये(10 लाख डॉलर) जाळून टाकले आहेत. ब्रूस मेककॉनविले (55)नं न्यायालयात याची कबुली दिली आहे. ही रक्कम त्यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर आणि डिसेंबरदम्यान जाळली आहे. परंतु याचे कोणताही पुरावे उपलब्ध नाहीत. त्यानं न्यायालयानं त्या रकमेच्या पावत्या दाखवल्या आहेत.
न्यायालयाचा अवमान केल्यानं त्याला 30 दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पत्नीच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेनं मी चिडलेलो होतो. त्यामुळे मी पैसे जाळून टाकल्याचं उद्विग्न झालेल्या पतीनं सांगितलं आहे. या प्रकारानंतर न्यायमूर्ती केविन फिलीप यांनी त्यांना फटकारलं आहे. स्वतःचा राग व्यक्त करण्यासाठी फक्त तुम्ही न्यायालयाचाच अपमान केलेला नव्हे, तर मुलाच्या भविष्याकडेही दुर्लक्ष केलं आहे.
दररोज दीड लाख रुपयांचा दंड
न्यायालयानं संपूर्ण संपत्ती माहिती न दिल्यानं आरोपीला न्यायमूर्ती केविन फिलीप यांनी दररोज जवळपास दीड लाख रुपये(2 हजार डॉलर)दंड देण्यास सांगितलं आहे.