2 कोटी रुपयांमध्ये विकत घ्या अख्खे गाव! पर्यटन प्रकल्प तोट्यात; परिसर पडला ओस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 08:42 AM2022-11-15T08:42:19+5:302022-11-15T08:42:59+5:30
village : स्पेनमधील झामोरा प्रांतात व पोर्तुगालच्या सीमेलगत असलेले सॉल्टो दी कॅस्ट्रो हे गाव २.१ कोटी रुपयांना कोणीही खरेदी करू शकतो. लोकप्रिय पर्यटनस्थळ बनविण्यासाठी या गावाच्या मालकाने तिथे तीस वर्षांपूर्वी अनेक सोयीसुविधा निर्माण केल्या होत्या.
माद्रिद : स्पेनमधील झामोरा प्रांतात व पोर्तुगालच्या सीमेलगत असलेले सॉल्टो दी कॅस्ट्रो हे गाव २.१ कोटी रुपयांना कोणीही खरेदी करू शकतो. लोकप्रिय पर्यटनस्थळ बनविण्यासाठी या गावाच्या मालकाने तिथे तीस वर्षांपूर्वी अनेक सोयीसुविधा निर्माण केल्या होत्या. मात्र २०००च्या दशकात युरोझोनमधील आर्थिक संकटांमुळे त्याचा हा प्रकल्प तोट्यात गेला. आता हे गाव पूर्णपणे ओस पडलेले आहे.
तिथे ४४ घरे, एक हॉटेल, एक चर्च, एक शाळा, पालिकेचा जलतरण तलाव, सुरक्षा रक्षकांची इमारत अशा सोयी आहेत. हे गाव वसविणाऱ्या मालकाची रॉयल इन्व्हेस्ट नावाची कंपनी आहे.
युरोपातील तत्कालीन बिकट आर्थिक संकटामुळे गाळात गेलेला गावातील पर्यटन प्रकल्प कधीतरी उभारी घेईल, अशी त्याला अजूनही आशा आहे. त्यामुळे सॉल्टो दी कॅस्ट्रो हे गाव कोणीतरी बड्या उद्योजकाने विकत घेऊन तेथील पर्यटनाला नव्याने झळाळी द्यावी, अशी या गावच्या मालकाची अपेक्षा आहे.
गाव का ओस पडले?
१९५० साली इबरड्युरो या वीजनिर्मिती कंपनीचे कर्मचारी येथे एक जलाशय बांधत होते. त्यावेळी हे कर्मचारी गावांतील घरांमध्ये राहत होते. मात्र जलाशयाचे काम पूर्ण झाल्यानंतर ते दुसरीकडे स्थलांतरित झाले व हे गाव ओस पडले. त्यानंतर ते गाव रॉयल इन्व्हेस्ट कंपनीच्या मालकाने विकत घेतले व त्याचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरल्याने गाव ओसच राहिले.
विकत घेण्यासाठी जगभरातून मागणी
nसॉल्टो दी कॅस्ट्रो हे अख्खे गाव २ लाख २७ हजार युरो म्हणजे २ कोटी १६ लाख ८७ हजार ८३१ रुपयांना विकत मिळेल, अशा जाहिराती स्पेन, युरोपमधील मालमत्ताविषयक वेबसाईटवर झळकल्या आहेत.
nया जाहिरातीच्या रिटेल पेजला ५० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाव विकत घेण्यासाठी ब्रिटन, फ्रान्स, रशियातील सुमारे
३०० उद्योजकांनी रस दाखविला आहे.