"27 मे 2025 पर्यंत अमेरिकेत दुसरं गृहयुद्ध पेटणार, संपूर्ण देश उध्वस्त होणार...!" टाइम ट्रॅवलरची थरकाप उडवणारी भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:35 IST2025-03-04T16:35:29+5:302025-03-04T16:35:43+5:30
थॉम्पसन यांच्या सर्वात धक्कादायक भाकितांपैकी एक भाकीत म्हणजे, ६ एप्रिल २०२५ रोजी अमेरिकेतील ओक्लाहोमा शहराला एक विनाशकारी चक्रीवादळ येईल आणि ते या शहराला उद्ध्वस्त करेल.

"27 मे 2025 पर्यंत अमेरिकेत दुसरं गृहयुद्ध पेटणार, संपूर्ण देश उध्वस्त होणार...!" टाइम ट्रॅवलरची थरकाप उडवणारी भविष्यवाणी
एल्विश थॉम्पसन नावाच्या एक व्यक्तीने स्वतःला 'टाइम ट्रॅव्हलर' म्हणून घोषित केले आहे. या व्यक्तीने २०२५ साठी काही विनाशकारी घटनांसंदर्भात भाकितं केली आहेत. जी सोशल मीडियावरही व्हायरल झाली आहेत. बल्गेरियातील बाबा वेंगा आणि १६ व्या शतकातील प्रसिद्ध भविष्यवक्ता नॅस्ट्रॉडेमस यांच्याप्रमाणेच, थॉम्पसन यांनीही भाकितं वर्तवली आहेत. काही गंभीर घटनांसंदर्भात दावा केला आहे.
थॉम्पसन यांच्या सर्वात धक्कादायक भाकितांपैकी एक भाकीत म्हणजे, ६ एप्रिल २०२५ रोजी अमेरिकेतील ओक्लाहोमा शहराला एक विनाशकारी चक्रीवादळ येईल आणि ते या शहराला उद्ध्वस्त करेल. थॉम्पसन यांनी दावा केला आहे की, हे वादळ २४ किलोमीटर रुंद असेल आणि त्याचा वेग ताशी १,०४६ किमी एवढा असेल. या घटनेमुळे लाखो लोक प्रभावित होऊ शकतात आणि मोठा विनाश होऊ शकतो.
दुसऱ्या गृहयुद्धासंदर्भात भविष्यवाणी -
थॉम्पसन यांची दुसरी सर्वात मोठी भविष्यवाणी गृह युद्धासंदर्भात आहे. त्यांच्या या भविष्यवाणीनुसार, २७ मे २०२५ पर्यंत अमेरिकेत दुसरे गृहयुद्ध सुरू होईल. या गृहयुद्धामुळे टेक्सास अमेरिकेपासून वेगळे होईल. याच बरोबर एक अणु संघर्षही सुरू होऊ शकतो, जो संपूर्ण देशाला उद्ध्वस्त करेल, असा दावाही त्यांनी केला आहे.
एलियन्ससंदर्भातही भविष्यवाणी -
थॉम्पसन यांच्या भविष्यवाणीत केवळ विनाशकारी घटनांचाच उल्लेख नाही, तर एलियन्ससोबतच्या संघर्षाचाही उल्लेख आहे. त्यांनी दावा केला आहे की, 1 सप्टेंबर 2025 रोजी "चॅम्पियन" नावाचा एक एलियन पृथ्वीवर येईल आणि 12,000 माणसांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी एका दूरच्या ग्रहावर घेऊन जाईल. थॉम्पसन यांची ही भविष्यवाणीही, अनेकांसाठी आश्चर्यकारक आहे.
थॉम्पसन यांची ही भाकितं सोशल मीडियावर 2.6 कोटींहूं अधिक वेळा बघितली गेली आहेत. यावर युजर्सच्या विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही येत आहेत.