पंतप्रधान म्हणून शेवटच्या भोजनात कॅमरुन यांनी मागवले भारतीय पदार्थ
By admin | Published: July 14, 2016 09:21 AM2016-07-14T09:21:55+5:302016-07-14T09:37:19+5:30
ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हीड कॅमेरुन यांनी १० डाऊनिंग स्ट्रीट या आपल्या कार्यालयात शेवटचे भोजन घेताना भारतीय पदार्थांची ऑर्डर केली होती.
Next
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. १४ - ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हीड कॅमेरुन यांनी १० डाऊनिंग स्ट्रीट या आपल्या कार्यालयात शेवटचे भोजन घेताना भारतीय पदार्थांची ऑर्डर केली होती. मध्य लंडनमधील केनिनग्टॉन तंदुर या हॉटेलने टि्वट करुन कॅमरुन यांच्या कार्यालयात भारतीय पद्धतीच्या अन्नपदार्थांची डिलीव्हरी पोहोचवल्याची माहिती दिली.
हैदराबादी चिकन, काश्मीरी रोगान जोश, नशीली गोस्ट, चिकन झलफ्राझी, साग आलू, साग पनीर, पालक गोस्ट, व्हेज समोसा, नान ब्रेड असे भारतीय पद्धतीचे पदार्थ मागवले होते. सर्वपक्षीय राजकारण्यांचे हे पसंतीचे हॉटेल आहे. १९८५ साली केनिनग्टॉन तंदुरहॉटेल चालू झाल्यापासून १० डाऊनिंग स्ट्रीटचे रहिवाशी या हॉटेलमधल्या रुचकर अन्नपदार्थांचा स्वाद घेत आहेत.
कॅमरुन यांना भारतीय पद्धतीचे जेवण आवडते. कार्यालयाच्याच बाजूला कॅमरुन यांचे घर होते. नॉटिंग हिल भागात कॅमरुन यांचे स्वत:चे घर आहे. पण ते मध्य लंडनमध्ये भाडयाच्या घरात रहायला जाणार आहेत.