कॅमेरुनच्या उपपंतप्रधानांच्या पत्नीचे दहशतवाद्यांकडून अपहरण
By admin | Published: July 28, 2014 12:23 PM2014-07-28T12:23:27+5:302014-07-28T13:14:57+5:30
कॅमेरुनचे उपपंतप्रधान अमादो अली यांच्या पत्नीचे बोको हराम या दहशतवादी संघटनेने अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Next
ऑनलाइन टीम
याउंडे, दि. २८ - कॅमेरुनचे उपपंतप्रधान अमादो अली यांच्या पत्नीचे बोको हराम या दहशतवादी संघटनेने अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी याउंडेतील महापौर शेनी बऊकार यांचेदेखील अपहरण केले असून या दहशतवादी हल्ल्यात सुमारे १० जण ठार झाले आहे.
नायजेरियातील बोको हराम या संघटनेने गेल्या काही दिवसांपासून कॅमेरुनवरील हल्ले वाढवले आहेत. कॅमेरुनने नायजेरियातील दहशतवादी संघटना संपवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सैन्याची मदत केल्याचा बदला घेण्यासाठी बोको हरामने कॅमेरुनला लक्ष्य केले आहे. रविवारी बोको हरामच्या दहशतवाद्यांनी कॅमेरुनमधील कोलोफाटा येथे उपपंतप्रधानांच्या घरावर हल्ला केला. हा भाग नायजेरियाच्या सीमेलगत येतो. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी उपपंतप्रधानांच्या पत्नचे अपहरण केले. या दहशतवादी हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाला.