मोदींच्या भाषणासाठी अमेरिकेत मोहीम

By admin | Published: July 13, 2014 12:57 AM2014-07-13T00:57:05+5:302014-07-13T00:57:05+5:30

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करावे यासाठी अमेरिकी खासदारांच्या मोहिमेला वेग आला आहे.

Campaign in America for Modi's speech | मोदींच्या भाषणासाठी अमेरिकेत मोहीम

मोदींच्या भाषणासाठी अमेरिकेत मोहीम

Next
वॉशिंग्टन : भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करावे यासाठी अमेरिकी खासदारांच्या मोहिमेला वेग आला आहे. मोदी हे सप्टेंबरमध्ये अमेरिका दौ:यावर जाणार आहेत.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शुक्रवारी मोदी यांना अमेरिका दौ:याचे औपचारिक निमंत्रण दिले. 21 व्या शतकात द्विपक्षीय संबंध ‘निर्णायक भागीदार’ म्हणून नावारूपाला आणण्यासाठी मोदी यांच्यासोबत मोठय़ा सामंजस्याने काम करण्याची इच्छा ओबामा यांनी व्यक्त केली.
नवी दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मोदी यांनी निमंत्रणासाठी ओबामा यांचे आभार मानले. ‘ठोस निर्णय’ असलेल्या एका यशस्वी दौ:याच्या अपेक्षा व्यक्त करत मोदी यांनी उभय देशांतील धोरणात्मक भागीदाराला ‘नवी गती आणि ऊर्जा’ देण्याची गरज प्रतिपादित केली.
अमेरिकी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करण्यासाठी मोदी यांना निमंत्रित करावे म्हणून 36 खासदारांनी प्रतिनिधी सभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. या मोहिमेचे नेतृत्व खा. ब्रँड शेरमन, टेड पोए आणि एनी फाले ओमवाएहा यांच्याद्वारे केले जात आहे. तथापि, यासंदर्भात कोणताही निर्णय अद्याप झाला नसल्याचे अध्यक्षांच्या कार्यालयाने स्पष्ट केले. काँग्रेस अर्थात अमेरिकी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करण्यासाठी देण्यात येणा:या आमंत्रणाकडे एखाद्या विदेशी राष्ट्रप्रमुखाचा काँग्रेसद्वारा केला जाणारा सर्वोच्च सन्मान म्हणून पाहिले जाते.  (वृत्तसंस्था)
 

 

Web Title: Campaign in America for Modi's speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.