कॅनडात पाच वर्षांची चिमुरडी बनली एका दिवसासाठी पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2017 04:12 PM2017-05-27T16:12:31+5:302017-05-27T16:14:12+5:30

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुदाँ यांनी एका पाच वर्षांच्या चिमुरडीला एका दिवसासाठी पंतप्रधान करुन टाकलं.

In Canada, a five-year-old girl becomes Prime Minister for a day | कॅनडात पाच वर्षांची चिमुरडी बनली एका दिवसासाठी पंतप्रधान

कॅनडात पाच वर्षांची चिमुरडी बनली एका दिवसासाठी पंतप्रधान

Next
>ऑनलाइन लोकमत
टोरंटो, दि. 27 - कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुदाँ नेहमी आपल्या वेगवेगळ्या कामांमुळे आंतरराष्ट्रीय मीडियात चर्चेला असतात. आपल्या सकारात्मक कामं आणि धोरणांमुळे ते नेहमी चर्चेत असतात. यामुळेच जस्टिन त्रुदाँ यांचे समर्थक फक्त कॅनडापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. गेल्याच आठवड्यात जस्टिन त्रुदाँ  यांनी असं काही केलं, की पुन्हा एकदा त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पंतप्रधान जस्टिन त्रुदाँ आपल्या कार्यालयात एका पाच वर्षाच्या मुलीसोबत खेळतानाचे फोटो प्रसिद्द झाले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी तिला एक दिवसासाठी पंतप्रधानही करुन टाकलं. 
 
सीबीसी किड्सच्या एका स्पर्धेत पाच वर्षाच्या बेला थॉम्पसनने पहिला क्रमांक पटकावला होता. स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवल्याने तिला एका दिवसासाठी पंतप्रधान कार्यालयात जाण्याची संधी मिळाली. बेला जेव्हा पंतप्रधान कार्यालयात पोहोचली तेव्हा पंतप्रधान जस्टिन त्रुदाँ यांच्यासोबत चांगली रमलेली दिसली. दोघांनीही खेळत चांगला वेळ घालवला. यावेळी पंतप्रधान जस्टिन त्रुदाँ यांनी कार्यालयातील सामानाचा वापर करत बेलाचं मनोरंजन केलं. सीबीसी किड्सने दोघांचे फोटो ट्विट केले आहेत. "जेव्हा एक पाच वर्षाचं मूल एक दिवसांसाठी पंतप्रधान बनतं, तेव्हा काय होतं ?", असं कॅप्शनही दिलं आहे. 
याआधी काही दिवसांपुर्वी जस्टिन त्रुदाँ यांनी पंतप्रधान कार्यालयात आपल्या तीन वर्षाच्या मुलासह येऊन लपाछपी खेळत अनेक महत्त्वाची कामेही पार पाडली होती. आपल्या मुलासोबतचा फोटोही त्यांनी ट्विट केला होता. यानंतर अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. जस्टिन त्रुदाँ नेहमी काहीचरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्यातील माणुसकीची नेहमीच चर्चा करत कौतुक केलं जातं.
 
 

Web Title: In Canada, a five-year-old girl becomes Prime Minister for a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.