कॅनडा: संसदेत विरोधकांची शीख संरक्षणमंत्री सज्जान यांच्याविरुद्ध वांशिक टिप्पणी
By admin | Published: February 4, 2016 06:59 PM2016-02-04T18:59:14+5:302016-02-04T20:08:12+5:30
कॅनडाचे शीख संरक्षणमंत्री हरजीत सज्जान यांच्याविरोधात संसदेत विरोधकांनी वांशिक टिप्पणी केली
Next
>ऑनलाइन लोकमत
टोरांटो, दि. ४ - कॅनडातील शीख संरक्षणमंत्री हरजीत सज्जान यांना पुन्हा एकदा 'वांशिक' टिप्पणीला सामोरे जावे लागले आहे. इस्लामिक स्टेटविरोधात लष्कराच्या सुरू असलेल्या मोहिमेबद्दल हरजीत सज्जान संसदेत उत्तर देत असतानाच विरोधी पक्षातील नखासदार जेसन केन्ने यांनी त्यांच्याविरोधात टिप्पणी केली.
माजी संरक्षणमंत्री असलेल्या केन्ने यांनी ' सर्व खासदारांना हरजीत सज्जन यांच्या उत्तराचे इंग्रजीमध्ये भाषांतर हवे आहे' असे सांगत वांशिक टिप्पणी केली. गेल्या वर्षी कॅनडातील नवनिर्वाचित पंतप्रधान जस्टिन ट्रुडी यांच्या मंत्रिमंडळात तीन भारतीय वंशांच्या खासदारांची वर्णी लागली. संरक्षण खात्यासारख्या महत्त्वाच्या विभागाचा कार्यभार भारतीय वंशाचे हरजित सज्जान (वय ४५) यांच्याकडे सोपवण्यात आला. सज्जान यांचा जन्म भारतातील असून ते ५ वर्षांचे असताना त्यांचे आईवडिल कॅनडात स्थायिक झाले होते.
यापूर्वीही सज्जान यांना वांशिक टिप्पणीला सामोरे जावे लागले होते. त्यांना एका सैनिकाकडून सोशल मीडियावर वांशिक टिप्पणीला तोंड द्यावे लागले होते. एका सैनिकाने फेसबुकवर फ्रेंच भाषेत सज्जान यांच्या वंशासंदर्भात अनुचित टिप्पणी केली होती.