कॅनडाने ४१ राजनयिकांना परत बोलावले, निज्जर वादानंतर भारताने देश सोडण्याचे दिले होते आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 07:46 AM2023-10-20T07:46:17+5:302023-10-20T07:46:35+5:30
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याची काही महिन्यापूर्वी हत्या झाली, या हत्येच भारताचा सहभाग असल्याचा आरोप खलिस्तानचे पीएम ट्रुडो यांनी केला होता.
गेल्या काही दिवसापूर्वी कॅनडाचे पीएम ट्रुडो यांनी भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग याच्या हत्येचा आरोप केला होता. यावरुन दोन्ही देशात तणाव वाढला होता, आता कॅनडाने भारतात उपस्थित असलेल्या आपल्या ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावले आहे. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी गुरुवारी १९ ऑक्टोबर मुत्सद्दींना बोलावल्याची माहिती दिली. कॅनडा बदला घेणार नाही असेही ते म्हणाले.
गाझात अडकले चार भारतीय, त्यांची सुटका करणे मुश्किल
कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांची प्रत्युत्तराची कारवाई म्हणजे भारतीय मुत्सद्यांना देश सोडण्याचे आदेश देणे. परराष्ट्र मंत्री जोली यांनी सांगितले की, भारताने राजनैतिक अधिकाऱ्यांना शुक्रवारपर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसे न केल्यास त्यांचा राजनैतिक दर्जा रद्द करण्यात येईल, असे त्यांना सांगण्यात आले. भारताचे हे पाऊल अयोग्य असून राजनैतिक संबंधांवरील व्हिएन्ना कराराचे स्पष्ट उल्लंघन आहे, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना कॅनडाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की, 'भारताच्या कारवाईमुळे आमच्या राजनयिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही त्यांना भारतातून परत बोलावले आहे.' 'जर आपण राजनैतिक प्रतिकारशक्तीसाठी बनवलेले नियम मोडू दिले तर जगातील एकही मुत्सद्दी सुरक्षित राहणार नाही. या कारणास्तव, आम्ही भारताच्या कारवाईला कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. भारत सोडून गेलेल्या ४१ मुत्सद्दी लोकांसोबतच त्यांच्या कुटुंबातील ४२ लोकही आहेत.
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची या वर्षी जूनमध्ये सरे शहरातील गुरुद्वारामध्ये हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर कॅनडात राहणाऱ्या खलिस्तान समर्थकांनी कॅनडाच्या सरकारवर दबाव आणण्यास सुरुवात केली. या हत्येत भारताचा हात असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर सप्टेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो संसदेत आले आणि भारतावर निज्जरच्या हत्येचा आरोप केला. तसेच, ओटावा येथे उपस्थित असलेल्या भारताच्या सर्वोच्च मुत्सद्द्याला देश सोडण्याचे आदेश देण्यात आले.
भारताने ट्रुडो यांचा दावा फेटाळून लावला आणि त्याला राजकीय हेतूने प्रेरित म्हटले. यानंतर भारतानेही प्रत्युत्तर देत कॅनडाच्या राजनैतिकाला देश सोडण्याचे आदेश दिले. येथूनच भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडायला सुरुवात झाली. यानंतर, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भारताने नवी दिल्लीत उपस्थित असलेल्या ४१ कॅनेडियन राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्यास सांगितले असल्याची बातमी आली. कॅनडाचे भारतात एकूण ६२ राजनयिक आहेत.