कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 03:13 PM2024-11-22T15:13:47+5:302024-11-22T15:18:09+5:30
Justin Treduea, Nijjar Murder Case, Canada India Relationship: निज्जर हत्याकांडात भारतावर बिनबुडाचे आरोप करणारं जस्टीन ट्रुडो सरकार आता बॅकफूटवर
Justin Treduea, Nijjar Murder Case, Canada India Relationship: आपल्या मतपेटीच्या राजकारणामुळे भारतासोबतचे संबंध बिघडवणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आता हळूहळू शांततापूर्ण भूमिका घेण्यास इच्छुक दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ट्रुडो सरकारने भारताचा समावेश 'सायबर क्षेत्रातील धोकादायक देश' या यादीत केला होता. त्यावरून भारत-कॅनडा यांच्यातील संबंध अधिक तणावपूर्ण झाले होते. पण आता निज्जर हत्या प्रकरणी कॅनडाचे नवे वक्तव्य समोर आले आहे. निज्जर हत्याकांडात भारत सरकारची कोणतीही भूमिका नाही, असे कॅनडाच्या सरकारने म्हटले आहे. निज्जर हत्याकांडामध्ये भारताचे सर्वोच्च नेतृत्व सहभागी असल्याचा 'द ग्लोब अँड मेल'चा दावा होता. हा दावा कॅनडा सरकारने फेटाळून लावला. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या वृत्तपत्राच्या या वृत्ताचे खंडन केले होते. कॅनडाची प्रसारमाध्यमे भारताची बदनामी करण्यासाठी मोहीम चालवत असल्याचा आरोप भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला होता.