दुष्काळाची छाया; 'या' शहरात उरलाय फक्त ९० दिवसांचा पाणीसाठा; फ्लश बंद, आंघोळीवरही निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 01:46 PM2018-02-07T13:46:36+5:302018-02-07T13:51:44+5:30

तीन वर्षापासून पावसानं पाठ फिरवल्यामुळं या शहरावर दुष्काळाची समस्या ओढावली आहे.

cape-town-drought-this-city-could-become-world-first-big-city-to-run-out-of-water | दुष्काळाची छाया; 'या' शहरात उरलाय फक्त ९० दिवसांचा पाणीसाठा; फ्लश बंद, आंघोळीवरही निर्बंध

दुष्काळाची छाया; 'या' शहरात उरलाय फक्त ९० दिवसांचा पाणीसाठा; फ्लश बंद, आंघोळीवरही निर्बंध

googlenewsNext

केपटाऊन - दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन सध्या दुष्काळचा सामना करत आहे. तीन वर्षापासून पावसानं पाठ फिरवल्यामुळं या शहरावर दुष्काळाची समस्या ओढावली आहे. केपटाऊनमध्ये पाण्याची समस्या एवढी भयानक आहे की शहराला फक्त 90 दिवस पुरेल एवढात पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तज्ञांच्या मते 11 मे 2018 ला केपटाऊनमध्ये पाण्याची समस्या आधिक गंभीर होणार आहे. येथील तलावात फक्त 30 टक्के पाणीसाठी बाकी आहे. पाणी वाचवण्यासाठी शहरातील पाईपलाईन बंद करण्यात आली आहे. पाण्याची समस्या वाढल्यास प्रत्येक व्यक्तीला दिवसांला फक्त 25 लिटर पाणी दिलं जाईल. शहरातील 200 ठिकाणी पोलिसांच्या बंदोबस्तात हे पाणी वाटप केलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

दिवसेंदिवस पाण्याची समस्या वाढत चालली असून, त्यासाठी गरजेचे सर्वोपतरी प्रयत्न सुरु आहेत. याआधी पाणी वाचवण्यासाठी एका व्यक्तीला दिवसाला फक्त 87 लीटर पाणी देण्याची परवनागी स्थानिक प्रशासनाने दिली होती. पण केपटाऊनमधील पाणी समस्या दिवसेंदिवस गंभीर  होत असून पाण्याचा स्तर खालावत आहे. त्यामुळे पुर्ण फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक व्यक्तीला 50 लीटरपेक्षा अधिक पाणी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.   

जर शॉवरचा वापर करत असाल तर दोन मिनीटात अंघोळ उरकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गाडी धुण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे टॉलेटमधील फ्लॅशचा वापर कमी करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. आघोंळीला वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर पुन्हा ( रिसाइकिल) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  वाशिंग मशीन वापरण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. केपटाऊन शहरामध्ये नळावर पाणी घेण्यासाठी लांबच लांब लाईन लागली आहे.  गेल्या पाच वर्षांमध्ये येथे पाणी वाचण्याचा प्रयोग झालेला नाही. 

वाढत्या पाणीसंकाटावर मात करण्यासाठी आधिकारी समुद्राचे पाणी स्वच्छ आणि पिण्यायोग्य करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे नळ, नाल्यातून येणारे पाणी रिसाइकिल करण्यावर भर दिला जात आहे. केपटाऊनशी संबंधित एका अधिका-याची पिण्यायोग्य असणा-या पाण्याच्या प्रत्येक थेंबाच्या वापरावर नजर असते. येथे पाणी लेव्हल 6 वर पोहोचलं आहे. याचा अर्थ पाण्याचा वापर रोपटी, पूल आणि इतर कामांसाठी केला जाऊ शकत नाही. जर एखाद्या नागरिकाने आदेशाचं पालन केलं नाही तर एक लिटर पाण्यासाठी जवळपास 51 हजारांचा दंड ठोठावण्यात येतो.  

1977 नंतर केपटाऊनमध्ये प्रत्येक वर्षाला सरासरी 508 मिलीमीटर पाऊस पडला आहे. पण गेल्या तीन वर्षांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये केपटाऊनमध्ये सरासरी प्रत्येक वर्षी अनुक्रमे 153 मिमी, 221 मिमी आणि 327 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

Web Title: cape-town-drought-this-city-could-become-world-first-big-city-to-run-out-of-water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.