लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमजवळ कारने पादचा-यांना दिली धडक, एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 08:17 PM2017-10-07T20:17:44+5:302017-10-07T20:53:27+5:30

लंडनच्या प्रसिद्ध नॅचरल हिस्ट्री म्युझियमजवळ एका कारने काही पादचा-यांना धडक दिली.

Car caught a pedestrian near the Natural History Museum in London | लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमजवळ कारने पादचा-यांना दिली धडक, एकाला अटक

लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमजवळ कारने पादचा-यांना दिली धडक, एकाला अटक

Next

लंडन - लंडनच्या प्रसिद्ध नॅचरल हिस्ट्री म्युझियमजवळ एका कारने काही पादचा-यांना धडक दिली. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावरुन एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. लंडन पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एक्झिबिशन रोडच्या प्रवेशव्दारावर वेगात आलेल्या एका कारने पादचा-यांना धडक दिली असे म्युझियमच्या प्रवक्त्याने सांगितले. 

लंडन फिरायला येणारे पर्यटक इथे मोठया संख्येने येत असतात. त्यामुळेच नेहमीच इथे पर्यटकांची वर्दळ असते. कार चालकाने गाडी थेट फुटपाथवर चढवली असे ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. घटनास्थळी पोलिसांनी झडप घालून एका व्यक्तीला  पकडले. हा अपघात होता की, घातपात त्याचा तपास सुरु आहे. कार चालकाचा नेमका उद्देश काय होता ते लंडन पोलिसांनी अजून स्पष्ट केलेले नाही. 

अपघातानंतर घटनास्थळावर लगेच लंडनच्या अॅम्ब्युलन्स सेवेला बोलावण्यात आले. आपण पोलिसांना तपासात सहकार्य करत आहोत अशी माहिती म्युझियमकडून देण्यात आली आहे. म्युझियमच्या आसपासच्या इमारती रिकामी करण्यात आल्या असून, म्युझियमच्या दिशेने जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. 


इंग्लंडमध्ये या वर्षात पाच दहशतवादी हल्ले झाले असून, त्यातील तीन हल्ले कार गर्दीमध्ये घुसवून करण्यात आले. त्यामुळे हा निव्वळ अपघात होता की, घातपात त्याचा पोलीस कसून तपास करत आहेत. चार दिवसांपूर्वी अमेरिकेच्या लास वेगस शहरात एका टोलेजंग इमारतीच्या ३२व्या मजल्यावरून खुल्या मैदानातील खचाखच भरलेल्या संगीत महोत्सवावर एका माथेफिरूने केलेल्या गोळीबारात तब्बल ५८ जण ठार झाले. 

या हल्ल्याने लास वेगससारखे पर्यटकांचे हब हादरले असून, संपूर्ण अमेरिकेलाही याचा धक्का बसला आहे. रात्रीच्या काळोखात हॉटेलच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरून येणा-या बंदुकीच्या गोळ्यांच्या प्रकाशशलाका प्रत्यक्षदर्शीनी पाहिल्या. त्यामुळे घटनेनंतर काही मिनिटांतच तेथे दाखल झालेल्या पोलिसांच्या विशेष ‘स्वॅट’ पथकाने सरळ मोर्चा हॉटेलकडे वळविला. ३२ व्या मजल्यावर हल्लेखोर सापडला व तेथेच त्यास ठार मारण्यात आले

Web Title: Car caught a pedestrian near the Natural History Museum in London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.