ब्रिटनमधील 34 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची आज नोकरी जाणार; 'या' कारणामुळे सरकारने उचलली कठोर पावले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 02:53 PM2021-11-11T14:53:49+5:302021-11-11T14:55:44+5:30

Care homes in England : 'द सन' च्या रिपोर्टनुसार, नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या (NHS) आकडेवारीनुसार एकूण 34,000 फ्रंट लाइन वर्कर्सना कामावरून कमी करण्याची तयारी पूर्ण झाली आहे.

Care homes in England set to lose 50,000 staff as Covid vaccine becomes mandatory | ब्रिटनमधील 34 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची आज नोकरी जाणार; 'या' कारणामुळे सरकारने उचलली कठोर पावले

ब्रिटनमधील 34 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची आज नोकरी जाणार; 'या' कारणामुळे सरकारने उचलली कठोर पावले

Next

लंडन : ब्रिटनमधील (Britain) 30,000 हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा आजचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून हे आरोग्य कर्मचारी बेरोजगार होतील. दरम्यान, हे असे आरोग्य कर्मचारी आहेत, ज्यांनी अद्याप कोरोनाची लस (Corona Vaccine) घेतलेली नाही. याशिवाय, ज्यांनी कोरोना लसीचा फक्त एकच डोस घेतला आहे, त्या केअर होम कर्मचाऱ्यांनाही कामावर येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. रुग्णांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

'द सन' च्या रिपोर्टनुसार, नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या (NHS) आकडेवारीनुसार एकूण 34,000 फ्रंट लाइन वर्कर्सना कामावरून कमी करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. यामध्ये वैद्यकीय कारणांचा हवाला देत लस घेण्यास नकार देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आरोग्य सचिव साजिद जाविद  (Sajid Javid) म्हणाले की, रुग्णांच्या सुरक्षेचा विचार करून आम्ही हे पाऊल उचलले आहे. त्यांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.
 
Deadline वाढवण्याच्या मागणीला नकार
लसीकरणाची अंतिम मुदत एप्रिलपर्यंत वाढवावी, अशी मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी (Health Workers) केली होती. मात्र, सरकारने काल आरोग्य कर्मचाऱ्यांची ही मागणी मान्य करण्यास नकार दिला होता. दुसरीकडे, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे समोर येत असताना, सरकारच्या या निर्णयामुळे हिवाळ्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तीव्र कमतरता भासू शकते.

'सरकारने विश्वासघात केला'
बोरिस जॉन्सन सरकारच्या या निर्णयामुळे आरोग्य कर्मचारी प्रचंड संतापले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी लस न घेतल्यामुळे नोकरी गमावलेल्या डेव्ह केली (Dave Kelly)यांनी सांगितले की, कोरोनाच्या सुरुवातीला कोणत्याही संरक्षणाशिवाय जीव वाचवणाऱ्या शेकडो आरोग्य कर्मचाऱ्यांचा सरकारने विश्वासघात केला आहे. तसेच, केली म्हणाली, 'हे फ्रंट लाइन वर्कर्स होते, त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाबाधितांवर उपचार केले. मात्र, सरकार एका झटक्यात सर्व काही विसरले.'

Web Title: Care homes in England set to lose 50,000 staff as Covid vaccine becomes mandatory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.