'या' बाबतीत चीन जगातील सर्वात धोकादायक देश

By admin | Published: September 28, 2016 05:00 PM2016-09-28T17:00:52+5:302016-09-28T17:00:52+5:30

अविश्वसनीय वेगाने आर्थिक प्रगती साधणारा आणि पर्यावरणाच्या हानीची फिकीर न करणारा चीन हा जगातील सर्वाधिक

In this case, China is the world's most dangerous country | 'या' बाबतीत चीन जगातील सर्वात धोकादायक देश

'या' बाबतीत चीन जगातील सर्वात धोकादायक देश

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28- अविश्वसनीय वेगाने आर्थिक प्रगती साधणारा आणि पर्यावरणाच्या हानीची फिकीर न करणारा चीन हा जगातील सर्वाधिक प्रदुषणकारी देश ठरला आहे.  जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमध्ये ही माहिती समोर आली आहे. 
 
जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगभरात तब्बल 30 लाख नागरिकांचा जीव केवळ वायु प्रदुषणामुळे गेला आहे.
 
समोर आलेल्या आकडेवारीनुसार 2012 साली चीनमध्ये तब्बल 10 लाख नागरिकांचा जीव प्रदुषणामुळे गेला . यामध्ये भारतही मागे नाही, भारतात जवळपास 6 लाख नागरिकांचा जीव निव्वळ वायु प्रदुषणामुळे गेला तर रशियामध्ये  1 लाख 40 हजार जणांना आपला जीव गमवावा लागला. 

Web Title: In this case, China is the world's most dangerous country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.